आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Manoj Vajpayee's Film 'Bhosle' Honored At The Asian Film Festival Barcelona, Won Two Awards

मनोज वाजपेयीचा चित्रपट 'भोसले' एशियन फिल्म फेस्टिव्हल बार्सिलोनामध्ये सन्मानित, मिळवले दोन अवॉर्ड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मागच्यावर्षी रिलीज झालेला मनोज वाजपेयी स्टारर चित्रपट 'भोसले' ला एशियन फिल्म फेस्टिव्हल बार्सिलोनामध्ये सन्मानित केले गेले आहे. चित्रपटाने 'बेस्ट स्क्रीनप्ले' आणि 'बेस्ट डायरेक्टर' अशा दोन पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. विस्थापितांच्या संघर्षावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन देवाशीष मखीजाने केले होते. तर मनोज वाजपेयी पोलिसाच्या मुख्य भूमिकेत होते. 


अवॉर्ड जिंकल्याबद्दल दिग्दर्शक देवाशीष म्हणाला की, फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार जिंकणे खूप सन्मानाची बाब आहे. त्याने सांगितले की, चित्रपटामध्ये जो प्रवाशांचा मुद्दा दाखवला गेला आहे. हे संपूर्ण एशियामध्ये प्रासंगिक आहे. टीमला शुभेच्छा देत दिग्दर्शक म्हणला की, याप्रकारचा विजय त्या पूर्ण टीमसाठी अवॉर्डसारखाच आहे, ज्यांनी सोबत मिळून चित्रपट तयार केला.  


चित्रपटात मनोज वाजपेयीने एका पोलिसाची भूमिका साकारली आहे, जो प्रवाशांचा संघर्ष आणि स्थानिक नेत्यांशी लढण्यात मदत करतो. सोबतच या चित्रपटात मुंबईमध्ये जगण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करत असलेल्या वेगवेगळ्या जातींचे मुद्देदेखील दाखवले गेले आहे. अशातच अभिनेता अमेझॉन प्राइमची सीरीज 'द फॅमिली मॅन' मध्ये दिसला होता. सध्या तो आपला आगामी चित्रपट 'मुंबई सागा' मध्ये व्यस्त आहे.