आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनप्रीत बादल यांचा प्रवास दोन नावांतून

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रकाशसिंग बादल मंत्रिमंडळातील माजी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य मनप्रीत बादल आता शिरोमणी अकाली दलाविरुद्ध निवडणूक लढवीत आहेत; पण त्यांच्या पारंपरिक गिद्दडबहा जागेवरून त्यांना विजय मिळेल की नाही याची चिंता त्यांना सतावते आहे. बराच विचारविनिमय करून त्यांनी दोन जागांवरून निवडणूक लढवायचे ठरवले आहे. त्यामुळे जेथून ते चारदा निवडून आले त्या जागेबरोबरच नव्या मौर विधानसभा मतदारसंघातूनही त्यांनी अर्ज दाखल केला आहे. बादल कुटुंबीयांतील यादवीमुळे आपला पराभव होऊ नये, अशी भीती मनप्रीत यांना वाटत आहे. ज्या जागांवरून मनप्रीत निवडणूक लढवीत आहेत त्या जागांवर प्रकाशसिंग बादल आणि त्यांचे चिरंजीव सुखबीर यांचेही लक्ष असल्यामुळे भीती वाटणे साहजिकच आहे.