आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG ! अनेक दिवसांपासून सर्दीमुळे त्रस्त होता व्यक्ती, डॉक्टरांना वाटले त्याला निमोनिया झाला आहे, पण सत्य समोर आल्यावर हैरान झाले डॉक्टर .....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्युयॉर्क- न्युयॉर्कमध्ये राहणारा ग्रेग फिलपॉट्स  अनेक दिवसांपासून सर्दीमुळे त्रस्त होता. चेकअप केल्यावर डॉक्टरांना वाटले की, त्याला निमोनिया किंवा ब्रॉन्काइटिस झाला असावा. पण नंतर दुसऱ्या एका डॉक्टरांनी चेकअप केल्यावर सांगितले या भयानक आजाराबद्दल. खरतर सर्दीमुळे नाक गळत असल्याचे तो समजत होता पण जे लिक्वीड त्याच्या नाकातुन गळत होते ते, त्याच्या मेंदुतून येत होते. 

 

- ग्रेगला या आजाराबद्दल तेव्हा कळाले जेव्हा एका पार्टीत जेवण करत असताना हे लिक्वीड त्याच्या नाकातुन खाली पडले. ग्रेगला त्यावेळेस खुप लाजिरवाणे वाटले. त्यानी सांगितले-'मी खुप परेशान झालो होतो. मी जेव्हा सार्वजनिक ठिकाणा असायचो तेव्हा पण अचानक माझ्या नाकातुन हे लिक्वीड यायचे. यामुळे माझ्यातला आत्मविश्वास मी गमावला होता. डॉक्टरांनी आधी सांगितले की, ही फक्त सर्दी आहे. पण नंतर कळाले की, ही फक्त सर्दी नसून हा एक भयानक आजार आहे.' 

 

कोणता आजार झाला होता ग्रेगला ?
- न्युयॉर्कच्या माउंट सिनाई रूग्णालयाकडुन सांगण्यात आले की, ग्रेग ज्याला सर्दीचे लिक्वीड समजत होता ते लिक्वीड त्याच्या मेंदुतील सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड होते. सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड ते लिक्विड असते, जे आपल्या मेंदुमध्ये असते आणि आपल्या मेंदुला स्थिर ठेवण्याचे काम करते. 

 

- ग्रेगच्या केसमध्ये हे लिक्वीड त्याच्या नाकातुन येत होते म्हणजे त्याला भयानक इंफेक्शन झाले होते. हा आजार तेव्हा अजुन गंभीर बनतो जेव्हा या लिक्वीड द्वारे बॅक्टेरीया आपल्या मेंदुत प्रवेश करतो, आणि यामुळे मॅनिंगाइटिस सारखा भयानक आजार होतो. 

 

- ग्रेग नशीबवान होता की, त्याच्या केसमध्ये या आजाराची लवकर माहीती मिळाली आणि त्याचा जीव वाचला.

 

बातम्या आणखी आहेत...