आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मनसाज निंबे   महाविद्यालयीन शिक्षणासाठी नागपूर येथे होस्टेलवर राहत होती. दोन वर्षे तिथेच एकटीचा संसार होता. प्रारंभी एकटीला या संसारामध्ये रमणे जड गेले. कारण प्रथमच आई-वडील, बहीण-भाऊ व घरापासून दूर राहत होते. त्यातच ग्रामीण भागातून आल्यामुळे शहरी वातावरण व होस्टेलचे हायफाय राहणे यांच्याशी जुळवून घेणे जड जात होते. कारण घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे अन्य मुलींप्रमाणे पैशाची उधळपट्टी करता येत नव्हती. वीस वर्षांपूर्वी घरून केवळ दीडशे रुपये पॉकेटमनी मिळत होता. त्यात बसची पास व पंधरा दिवसांमधून एकदा गावाला ये-जा करणे आणि कॉलेजचा खर्च भागवावा लागत होता.  होस्टेलचे पहिलेच वर्ष. चार-सहा महिने होत नाही तोच कपाटातून कुणीतरी पैसे लांबवले होते. नशीब बसची पास पूर्वीच काढली होती. आईबाबांना याबाबत घरी गेल्यानंतर सांगितले. फायनान्स मिनिस्टर म्हणजे बाबा काही बोलले नाहीत. उलट त्यांनी आपल्या फाटक्या खिशातून काही पैसे काढून हातावर ठेवले, परंतु होम मिनिस्टर म्हणजे माझी आई जाम भडकली. दीडशे रुपयांचा पॉकेटमनी एकदम ५० रुपयांवर आला. त्या प्रसंगाने शिकवले की, पैसे किंवा मौल्यवान वस्तू कशा सांभाळून ठेवायच्या? परंतु आजही बॅगमध्ये भरपूर पैसे असतील तर ते व्यवस्थित ठेवले असतील असे होत नाही. त्यासाठी आमच्या होम मिनिस्टर व मित्र परिवाराकडून शाब्दिक लाखोली ऐकावीच लागते.  

बातम्या आणखी आहेत...