आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mansoor Ali Khan Pataudi Special Story On Their Birthday

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज आहे क्रिकेटच्या 'टायगर'चा जन्मदिवस, परदेशात जिंकवली होती पहिली कसोटी मालिका, डोळ्याला दुखापत होऊनही जिद्दीने खेळला क्रिकेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


स्पोर्ट डेस्क : भारताचे माजी कर्णधार मंसूर अली खान पतौडी यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांना भारताचा सर्वात महान कर्णधार समजले जात असे. त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने प्रथमच परदेशात कसोटी मालिका जिंकली होती. एका अपघातात त्यांच्या एका डोळ्याला इजा झाली होती. पण त्यानंतरही त्यांनी क्रिकेट खेळणे सोडले नाही. 

 

मंसूर अली खान पतौडी यांचा जन्म 5 जानेवारी 1941 रोजी भोपाळ येथे झाला होता. 1961 मध्ये एका कार अपघातात एक काचेचा तुकडा त्यांच्या डोळ्यात गेला होता. यामुळे त्यांचा उजवा डोळा खराब झाला. या दुर्घटनेनंतर सर्वांना वाटले की, आता त्यांचे करिअर संपुष्टात आले. पण या दुर्घटनेनंतरही त्यांनी हार मानली नाही आणि लवकरच क्रिकेटमध्ये स्मरणीय पुनरागमन केले. 

 

डोळ्याला दुखापत असून देखील त्यांनी 6 महिन्यांनंतर कसोटीमध्ये पदार्पण केले आणि इंग्लंडविरूद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील तिसऱ्या कसोटीतच 103 रन काढून भारतीय संघाला विजय तर मिळवून दिलाच पण त्यांच्या या खेळीमुळे भारताने इंग्लंडविरूद्ध पहिली कसोटी मालिका जिंकली होती. 

 

पतौडी भारताचे सर्वात कमी वयाचे कर्णधार होते. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी भारतीय संघाची धुरा सांभाळली होती. हा त्यांच्या नावावर एक रेकॉर्ड होता. पण नंतर झिम्बॉम्बेच्या ततेन्दा तायबूने हा रेकॉर्ड मोडीत काढला.