आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 8 नावांनी मिळते दीर्घायुष्य आणि वाढते आकर्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीर्घायुष्य, निरोगी आणि आकर्षक शरीर प्राप्त करण्यासाठी दररोज सकाळी पूजन कर्मासोबतच येथे सांगण्यात आलेल्या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्यास व्यक्ती आजारांपासून दूर राहतो आणि 100 वर्षांचे आयुष्य प्राप्त करतो, अशी शास्त्रांची मान्यता आहे....


हा आहे मंत्र 
अश्वत्थामा बलिव्र्यासो हनूमांश्च विभीषण:।
कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:॥
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।।


या मंत्राचा अर्थ असा आहे की, या आठ लोकांचे (अश्वत्थामा, दैत्यराज बळी, वेदव्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम आणि मार्कंडेय ऋषी) सकाळी-सकाळी स्मरण केल्यास सर्व आजार नष्ट होतात आणि मनुष्य निरोगी आणि आकर्षक शरीर प्राप्त करून 100 वर्ष जगू शकतो. एखाद्या व्यक्तीला या श्लोकाचा जप करणे शक्य नसल्यास, त्याने या अष्ट चिरंजीवींच्या नावांचा उच्चार केला तरी शुभफळ प्राप्त होऊ शकते.


येथे जाणून घ्या, या अष्ट चिरंजीवींच्या काही खास रोचक गोष्टी...
हनुमान -

कलियुगात हनुमान सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता मानले गेले असून हे अष्ट चिरंजीवीमधील एक आहेत. लंकेच्या अशोक वाटिकेत हनुमानाने देवी सीतेला श्रीरामाचा संदेश पोहोचवल्यानंतर सीतेने हनुमानाला अजरामर राहण्याचा आशीर्वाद दिला. अजरामर म्हणजे हनुमान कधीही वृद्ध होणार नाहीत आणि नेहमी जिवंत राहतील. यामुळे हनुमानाला शक्तीचा स्रोत मानले जाते.


कृपाचार्य -
कृपाचार्य हे महाभारतातील हस्तिनापूर राज्याचे कुलगुरू होते. कृपाचार्य युद्ध नीतीमध्ये कुशल तसेच परम तपस्वी ऋषी, जे कौरव आणि पांडवांचे गुरु होते.


अश्वत्थामा -
ग्रंथामध्ये महादेवाच्या विविध अवतारांचे वर्णन आहे. त्यामधील एक अवतार आजही पृथ्वीवर मुक्तीसाठी भटकत आहे. हा अवतार कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामा आहे. अश्वथामा तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात निपुण होता. शास्त्रामध्ये अश्वथामा अमर असल्याचे सांगण्यात आले आहे.


ऋषी मार्कंडेय -
महादेवाचे परम भक्त आहेत ऋषी मार्कंडेय . शिव उपासना आणि महामृत्युंजय सिद्धीने ऋषी मार्कंडेय यांनी अल्पायुवर मात करून चिरंजीव पद प्राप्त केले आहे.


विभीषण-
राक्षस राज रावणाचा लहान भाऊ आणि श्रीरामाचा परम भक्त आहे विभीषण. रावणाने देवी सीतेचे अपहरण केल्यानंतर विभीषणाने रावणाला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला परंतु रावणाने क्रोधात येउन विभीषणाला लंकेतून बाहेर काढले. विभीषण श्रीरामाला शरण गेले आणि रावणाचा नाश झाल्यानंतर लंकेच्या गादीवर विराजमान झाले. शास्त्रानुसार विभीषण आजही जिवंत आहेत.


दैत्य राज बळी -
शास्त्रानुसार राजा बळी भक्त प्रल्हादाचे वंशज आहेत. बळीने भगवान विष्णूंच्या वामन अवताराला स्वतःचे सर्वकाही दान केले होते. यामुळे यांना महादानी रुपात ओळखले जाते. राजा बळीवर श्रीहरी अत्यंत प्रसन्न होते. यामुळेच भगवान विष्णू राजा बळीचे द्वारपालही राहिले होते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन चरंजीवी व्यक्तीच्या खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...