आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ या एक मंत्राचा जप केल्याने मिळू शकते संपूर्ण रामायण वाचल्याचे पुण्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामायण हा भारतीय संस्कृतीतील अमूल्य ठेवा आहे. रामायण वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर आपल्या सात जन्माचे पाप नाहीसे होते असे सांगितले जाते. आजच्या धावपळीच्या जगात तर संपूर्ण रामायन वाचणे किंवा ऐकण्यासाठी वेळ नसतो. यासाठी खाली दिलेल्या एका श्लोकाचे योग्यप्रकारे जप केला तर संपूर्ण रामायण वाचण्याचे किंवा ऐकण्याचे फळ मिळते. याला एक श्लोकी रामायण असेही म्हणतात.

मंत्र - 

आदि राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनम्। 

वैदीहीहरणं जटायुमरणं, सुग्रीवसंभाषणम्।।

बालीनिर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरीदाहनम्। 

पश्चाद् रावण कुम्भकर्ण हननम्, एतद्धि रामायणम्।।

  • मंत्राचा अर्थ

श्रीराम वनवासात गेले, तेथे स्वर्ण मृग (हरीण)चा वध केला. वैदही म्हणजे देवी सीतेचे रावणाने हरण केले, रावणाकडून जटायूचा मृत्यू झाला. श्रीराम आणि सुग्रीवाची मैत्री झाली. बलीचा श्रीरामांनी वध केला. समुद्र पार करून लंका दहन केले. त्यानंतर कुंभकर्ण आणि रावणाचा वध केला. ही रामायणाची संक्षिप्त कथा आहे.

  • अशाप्रकारे करावा जप

सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ कपडे वस्त्र परिधान करून प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे विधिव्रत  पूजन करावे. श्रीरामाच्या प्रतिमेसमोर बसून रुद्राक्ष माळेने या मंत्राचा 108 वेळेस जप करा. शक्य असल्यास दररोज पाच माळ जप  करावा. जप करण्याची वेळ आणि स्थान शक्यतो बदलू नका.

  • मंत्र जपाचे फायदे

या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते. मनातील वाईट विचार नष्ट होतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पूजा करताना या मंत्राचा जप केल्याने भगवान श्रीरामाची कृपा लवकर प्राप्त होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...