आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिंत्रा-जबोंगचे सीईओ नारायण यांचा राजीनामा, हॉटस्टारमध्ये जाण्याची शक्यता...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ल- ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट समूहाचे पोर्टल मिंत्रा आणि जबोंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अनंत नारायणन यांनी राजीनामा दिला आहे. मिंत्राच्या वतीनेच ही माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी अमर नगरम यांना मिंत्रा आणि जबोंगचे प्रमुख बनवण्यात आले आहे.  नगरम समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कल्याण कृष्णमूर्ती यांना रिपोर्ट करतील.  


बिन्नी बन्सल यांनी गेल्या वर्षी कंपनी सोडल्यानंतर अनंत नारायणन राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या संदर्भात अनेक वृत्तांमध्ये दावा करण्यात आला आहे की, ते अाता हॉटस्टारमध्ये काम करतील. मिंत्राच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार मिंत्रा आणि जबोंगच्या विकासात अनंत यांचे मोठे योगदान आहे. ते गेल्या ३ वर्षांपासून कंपनीसोबत आहेत. अलीकडेच फ्लिपकार्टमधून  मिंत्रामध्ये आलेले अमर नगरम सात वर्षांपासून समूहासोबत काम करत आहेत. त्यांनी शॉपिंगला प्रत्येक कनेक्टेड डिव्हाइसवर पोहोच आणि स्वस्त करण्यासाठी काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...