आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालय सहसचिवाने घरगुती वादावरून पत्नीवर झाडल्या गोळ्या, नंतर स्वत: घेतला गळफास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- मंत्रालयीन सहसचिवाने आपल्या पत्नीवर गोळीबार करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत असलेल्या विजय पवार यांनी घरगुती वादातून गुरूवारी रात्री पत्नी सोनाली पवार यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. सोनाली यांना तत्काळ उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.


विजयकुमार भागवत पवार मंगळवेढ्यातील मरवडे गावचे रहिवासी असून मंगळवेढा तालुक्यातील ते पहिले जिल्हाधिकारी होते. त्यांनी नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून देखील काम पाहिले होते. सध्या ते मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत होते. होळीची सुट्टी असल्याने ते मुंबईहून घरी आले होते. घरी असताना मध्यरात्री उशिरा पत्नीसोबत घरगुती कारणावरून वाद झाला. त्यानंतर मध्यरात्री एक वाजता त्यांनी त्यांच्याकडील रिव्हॉव्हरमधून पत्नीवर 2 गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या पत्नीला तत्काळ खासगी रूग्णालयात नेले. प्राथमिक उपचार करून नंतर त्यांना सोलापूरच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्तिर आहे. 

बातम्या आणखी आहेत...