आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रानुसार जर तुम्ही वेळेनुसार या 10 मंत्राचे उच्चारण केले तर बदलू शकते तुमचे भाग्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्कः  हिंदू धर्मामध्ये मंत्रांचे विशेष महत्त्व आहे. मंत्राच्या माध्यमातून विविध कठीण कामही सहजपणे केले जाऊ शकतात. आपल्या ऋषीमुनींनी दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रत्येक कमापूर्वी एक विशेष मंत्र म्हणण्याचे विधान बनवले आहे, परंतु बदलत्या काळासोबत आपण या परंपरेपासून दूर होत चाललो आहोत. आज आम्ही तुम्हाला 10 अशाच मंत्रांची माहिती देत आहोत. हे मंत्र सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कमापूर्वी उपयोगात येऊ शकतात.


1. सकाळी उठताच दोन्ही हातांकडे पाहून करावा या मंत्राचा उच्चार
कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ।।


2. जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी करावा या मंत्राचा उच्चार
समुद्रवसने देवि पर्वतस्तन मंडले
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पशं क्षमस्व में।


3. दात घासण्यापूर्वी करावा या मंत्राचा उच्चार
आयुर्बलं यशो वर्चः प्रजाः पशुवसूनि च
ब्रह्म प्रज्ञां च मेधां च त्वन्नो देहि वनस्पते


4. जेवणापूर्वी करावा या मंत्राचा उच्चार
ऊँ सहनाववतु सहनौभुनक्तु, सहवीर्यम् करवावहै।
तेजस्विना वधीतमस्तु, माँ विद्विषावहै।।


5. जेवणानंतर करावा या मंत्राचा उच्चार
अगस्त्यम कुम्भकर्णं च शनिं च बडवानलं।
भोजनं परिपाकार्थ स्मरेद भीमं च पंचमं।


6. स्नान करताना करावा या मंत्राचा उच्चार
गंगे! च यमुने! चैव गोदावरी! सरस्वति! नर्मदे! सिन्धु! कावेरि! जलेस्स्मिन् सन्निधिं कुरु।।


7. सूर्यदेवाला अर्घ्य देताना करावा या मंत्राचा उच्चार
ऊँ भास्कराय विद्महे,महातेजाय धीमहितन्नो सूर्य: प्रचोदयात्।।


8. अभ्यासाला बसताना करावा या मंत्राचा उच्चार
ऊँ श्री सरस्वती शुक्लवर्णां सस्मितां सुमनोहराम्
कोटिचंद्रप्रभामुष्टपुष्टश्रीयुक्तविग्रहाम्

 

9. संध्याकाळी पूजा करताना करावा या मंत्राचा उच्चार
ऊँ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्

 

10. रात्री झोपताना करावा या मंत्राचा उच्चार
अच्युतं केशवं विष्णुं हरिं सोमं जनार्दनम्।
हसं नारायणं कृष्णं जपते दु:स्वप्रशान्तये।।

बातम्या आणखी आहेत...