आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या आजारपणाचा मांत्रिकाने असा घेतला फायदा..पत्नीला पाहून फिरली नियत, गुंगीचे औषध पाजून केला बलात्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- येरवडा परिसरात मांत्रिकाने एका विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आजारी पतीवर उपचार करतो असे सांगून नराधम मांत्रिकाने महिलेल्या आपल्या घरी बोलवले होते. विवाहितेला गुंगीचे औषध देऊन मांत्रिकाने 45 वर्षीव महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी मांत्रिक शब्बीर युनूस शेख याला अटक केलील आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, पीडितेचा पती मागील काही दिवसांपासून आजारी आहे. पीडितेने पतीवर उपचार करण्यासाठी मांत्रिकाला घरी नेले होते. मांत्रिकाने पतीवरुन लिंबू कापूर यांचा उतारा केला. त्याला भूतबाधा झाल्याचे सांगितले. पतीच्या मागील भूतबाधा नाहिसी करण्याच्या करण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला पेय दिले. त्यात त्याने गुंगीचे औषध मिसळलेले होते. त्यानंतर महिला बेशुद्ध झाली. या संधीचा फायदा घेत मांत्रिकाने आपल्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तरी याबाबत कोणाला सांगितल्यास पतीला जीवे ठार मारेल, धमकीही मांत्रिकाने पीडितेला दिली होती.  उतारे आणि जादूटोण्यासाठी मांत्रिकाने पीडितेकडून आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख रुपये उकळले आहे.

 

आरोपीच्या विरोधात बलात्कार आणि जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मांत्रिकाला 13 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...