आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Manushi Chillar To Become Sanyogita In Akshay Kumar's Film 'Prithviraj Chauhan', Preparing For Nine Months

अक्षय कुमारच्या आगामी 'पृथ्वीराज चौहान'मध्ये संयोगिताचे पात्र साकारणार मानुषी छिल्लर, नऊ महिन्यांपासून करत आहे तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क- मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर यशराज फिल्म्सचा आगामी चित्रपट 'पृथ्वीराज चौहान' मध्ये अक्षय कुमारसोबत त्याची नायिका संयोगिताच्या भूमिकेत दिसणार आहे. मानुषीला या चित्रपटात कास्ट करण्याची कहाणी सांगत डायरेक्टर डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणाले, 'आम्ही या भूमिकेमध्ये अनेक तरुणींचे ऑडिशन घेतले. यासाठी आम्हाला एका सुंदर आणि आत्मविश्वासू मुलीची गरज होती. जी आम्हाला मानुषीच्या रूपात मिळाली.' 


तिने या रोलसाठी अनेकदा ऑडिशन दिले कारण आम्हाला या कास्टिंगबाबत पूर्णपणे निश्चिंत व्हायचे होते आणि प्रत्येकवेळी ती काहीतरी चूक करायची. मात्र आम्ही तिला फायनली कास्ट केले आणि त्यानंतर ती मागील नऊ महिन्यांपासून आठवड्यात सहा दिवस रिहर्सल करत आहे.  

याबद्दल मानुषी म्हणाली... 
यश राज फिल्म्ससारख्या प्रोडक्शन हाउसद्वारे नायिकेच्या स्वरूपात निवडले जाणे माझ्यासाठी एक खूप मोठा सन्मान आहे. पहिल्या चित्रपटाच्या स्वरूपात प्रोजेक्ट मिळणे माझे सुदैव आहे. 

बातम्या आणखी आहेत...