आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Manushi Chillar To Play The Role In Akshay Kumar's Upcoming Film 'Prithviraj Chauhan'

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'पृथ्वीराज चौहान'मध्ये संयोगिताची भूमिका साकारणार मानुषी छिल्लर  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अक्षय कुमारच्या बिग बजेट 'पृथ्वीराज चौहान' चित्रपटासाठी कलाकारांची निवड झाली आहे. या चित्रपटात अक्षय पृथ्वीराजची भूमिका साकारणार आहेत. यात मोहम्मद गोरची भूमिका मानव वीज साकारणार आहे. पृथ्वीराजच्या पराक्रमावर हा चित्रपट आधारित आहे. तरी यात प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात येणार आहे. पृथ्वीराज आणि कनौजची राजकुमारी संयोगिताची प्रेम कथा दाखवली जाईल. या प्रेमकथेविषयी पृथ्वीराज यांच्या दरबारातील कवी चांद बरदाईने त्यांच्या कादंबरीत लिहिले होते.  सूत्रानुसार, संयोगिताच्या भूमिकेसाठी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला घेण्यात आले आहे. पृथ्वीराजच्या चार पत्नी होत्या असेही बोलले जाते.मात्र चित्रपटात फक्त दोनच पत्नी दाखवल्या जातील. संयोगिता पहिली पत्नी असेल तर दुसरी पत्नीच्या भूमिकेसाठी एखादी टीव्ही अभिनेत्री घेतली जाईल. तिचे फक्त ४ ते ५ दृश्य असतील. शूटिंग राजस्थान आणि उत्तर भारताच्या इतर राज्यात होणार आहे.   

बातम्या आणखी आहेत...