Home | National | Madhya Pradesh | many annotated commentary on of Amul's Butter Girls

५० वर्षांत अमूलच्या बटर गर्लचे अनेकांवर विनाेदी भाष्य; आतापर्यंत १० वेळा नाेटीस

दिव्य मराठी नेटवर्क | Update - May 20, 2019, 11:10 AM IST

व्यवस्थापक रूपिंदर म्हणाले, कंपनीचे खरे मालक ३६ लाख कुटुंबे

  • many annotated commentary on  of Amul's Butter Girls

    इंदूर - सहा वर्षांच्या चिमुरडीला राजकारण काय कळणार? दहशतवाद आणि चर्चित व्यक्तींवर भाष्य करणे तर दूरच. हे अशक्य असले तरी ‘अमूल’ च्या बटर गर्लने गेल्या पाच दशकांपासून ही िवनाेदी भाष्याची परंपरा सुरूच ठेवली आहे. ठिपक्यांचा फ्राॅक परिधान केलेली सहा वर्षांची ही मुलगी आहे. निळे केस आणि छाेट्या वेणीच्या या बटर गर्लला लाेक अमूलच्या उत्पादनाएवढेच पसंत करतात. जाहिरातींच्या माध्यमातून मिश्कील भाष्य करण्याची ही ५२ वर्षांची परंपरा आहे. एका संस्थेद्वारे वृत्तपत्रात प्रकाशित केली जाणारी जाहिरात तयार केली जाते, अशी माहिती अमूलचे व्यवस्थापकीय संचालक रूपिंदर सिंह साेढी यांनी दिली.


    देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्तींवर भाष्य केले नाही असे बटर गर्लच्या बाबतीत क्वचितच घडले असावे. लाँगेस्ट रनिंग कॅम्पेनचा विश्वविक्रम या चिमुरडीच्या नावावर आहे. गेल्या ५० वर्षांत बटर गर्लच्या तिरकस कटाक्षावर आतापर्यंत केवळ १० वेळा तक्रारी आल्या हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एकदा क्रिकेट क्षेत्रातील एक नामांकित व्यक्ती बटर गर्लच्या जाहिरातीमुळे दुखावले हाेते. जाहिरातीत ‘दाल में कुछ काला है’ असे भाष्य करण्यात आले हाेते. लाेकांनी नाेटीस जरूर दिली, परंतु आतापर्यंत एकही केस न्यायालयात दाखल करण्यात आली नाही. बटर गर्ल आता काेणत्या नामांकित व्यक्तीबद्दल भाष्य करेल याची कल्पना कंपनीतील लाेकांनाही नसे. अमूलने देशाचा विश्वास जिंकला आहे. हा केवळ ब्रँड राहिलेला नाही. गावातील छाेटे शेतकरी एकत्र येऊन ४५ हजार काेटी रुपयांची कंपनी चालवू शकतात याचे हे एक आदर्श उदाहरण आहे, असे साेढी यांनी सांगितले. आमच्या कंपनीचे खरे मालक गुजरातमधील ३६ लाख कुटुंबे आहेत. दुधात काही गडबड वाटली तर आम्ही त्याचा इतर गाेष्टींसाठी वापर करताे.

    फसवणूक टाळण्यासाठी उत्पादन नव्हे, घटक पाहा

    देशी तुपाच्या जागी डालडा, आइस्क्रीमच्या जागी फ्राेजन डेझर्ट. डेअरी उद्याेगात अस्सल पदार्थाच्या जागी स्वस्त उत्पादनांना अॅनालाॅग उत्पादने असे संबाेधले जाते. जुन्या काळापासून हे हाेत आले आहे. आज सर्वत्र वापरले जाणारे अॅनालाॅग उत्पादन म्हणजे मार्जरिन व खवा. मार्जरिनचा उपयाेग चीजच्या जागी हाेत आहे. खरे तर चीज दुधापासून तयार केले जाते. मार्जरिन मिल्क पावडर, व्हेजिटेबल आॅइलसह इतर गाेष्टींपासून तयार केले जात आहे. खवादेखील आजकाल व्हेजिटेबल आॅइलपासून तयार केला जात आहे. माव्याच्या जागी त्याचा वापर केला जाताे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहायचे असल्यास पदार्थामधील घटक पाहायला हवेत, असा सल्ला साेढी यांनी दिला.

Trending