आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हुशारी अनेकांकडे आहे, मात्र पैशाची कमी आहे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

इरशाद कामिल
 

जोड़ घटाव में उलझे उलझे
भूल गए हम ये
कौन महीना क्या तारीखें
कैसा मौसम है 
इस दुनिया में ऐसा ही था
ऐसा ही तो है
अक्ल तो सबके पास बहुत है
पर पै
सा कम है

या जगात हुशारी साऱ्यांकडे अतिशय भरपूर आहे. तिच्या अभावामुळे कधी काेणी मनुष्य चिंताक्रांत असलेला दिसलेला नाही. घर, कार्यालय, बाजारात आपणास नेहमी हुशारीचे परवानाप्राप्त व्यापारी जागाेजाग भेटतील. अरे नाही, तुम्हाला असे नव्हे, तसे करायला हवे हाेते. बस, तुम्ही हीच तर चूक केली, जर तसे केले असते तर चांगले झाले असते. तुम्ही असे का नाही केले / करीत? आता तुम्ही असे करा... हे, ते, असे, तसे, इकडे, तिकडे इतके समजावणारे कितीतरी लाेक आहेत. प्रश्न हा आहे की, परवानाप्राप्त हुशारीचे व्यापारी काेण असतात? ज्यांना असे वाटते की, आयुष्याने आपल्याला सारे काही धडे शिकवले आहेत, तेच खरे अकलेचे परवानाधारक व्यापारी आहेत. आता काही शिकवण्याची ना आयुष्यात क्षमता राहिली आहे, ना शिकण्याची त्यांची इच्छा. शिकत राहणे हे स्वत:ला जिवंत आणि तरुण ठेवण्याची सर्वात साेपी पद्धत आहे. जेव्हा आपण शिकणे बंद करताे तेव्हा त्रस्त हाेणे बंद करताे, जेव्हा एखाद्या गाेष्टीसाठीचे पछाडलेपण नाहीसे हाेते तेव्हा आपल्यातील मूल हरवून बसलेलाे असताे, जेव्हा आपल्यातील हे मूल हरवते तेव्हा आपण म्हातारे हाेताे. जेव्हा आपण म्हातारे हाेताे तेव्हा आपल्याला वाटते की आपणास बरीच अक्कल आहे, आपणास सारे काही माहीत आहे. खरे तर अकलेचा आणि वयाचा तसा काही संबंध नाही. अक्कल ही संधीची याेग्य निवड, याेग्य निर्णय यापेक्षा निराळी गाेष्ट नाही. आपण स्वत:ला हुशार, चतुर समजण्याची गरज नाही, तर याेग्य निवड करण्याची आहे. अक्कल ही इतरांना वाटण्यापेक्षाही अधिक वापरण्याची बाब आहे आणि त्याचा याेग्य वापर आपल्या इच्छेच्या मार्गानेच हाेत असताे.

जे लाेक नेहमीच स्वत:ला याेग्य मानतात ते स्वत:लाच इतरांपेक्षा अधिक हुशार मानत असतात. आपल्या आयुष्यात इतर काेणीही आपल्यापेक्षा याेग्य सल्ला देऊ शकत नाही, असा समज बळावलेला असताे. मार्ग तुमचा आहे, अनुभव तुमचा आणि ध्येयही तुमचेच असते. याेग्य-अयाेग्य, चांगले-वाईट, काळे-पांढरे याची नेमकी आेळख करता आली पाहिजे. आपल्या हे माहिती पाहिजे की, कुठे मेंदू वापरायचा आहे आणि कुठे मन. उसनवारीची हुशारी तुम्हाला राेबाेटपेक्षा वेगळे काही बनवू शकत नाही. ज्या समाजात आम्ही अनेक वर्षांपासून वावरत आहाेत त्या समाजाने माेठ्यांची काेणतीही गाेष्ट आदराने आणि काेणताही प्रतिप्रश्न न करता स्वीकारण्याची सवय जडवली आहे. खरे तर आदरपूर्वक तर्कवितर्क करणे म्हणजे काेणाचा अनादर करण्यासारखे नाही. कदाचित स्वत:शी किंवा इतरांशी तर्कवितर्क न करण्याच्या सवयीमुळे हुशारीचा वापर करण्याची आपली सवय दिवसेंदिवस कमी हाेऊ लागली आहे. म्हणूनच कदाचित आपण ‘यस सर’ किंवा ‘हां जी’चे गुलाम बनत चाललाे आहाेत. त्यामुळेच काेणी चुकीचे काही बाेलले तरी आमचे ताेंड उघडत नाही. त्यामुळेच कदाचित आपल्या समाजात अकलेचे ठेकेदार बरेचसे पाहायला मिळतात. म्हणूनच....

अक्ल के सब मरीज़ कहते हैं
मैं बड़ा कम दिमाग लड़का हूं
अपनी धुन में चलता रहता हूं
अपने मन की ही करता रहता हूं
अक्ल के सब मरीज़ कहते हैं
मैं बड़ा कम दिमाग़ लड़का
हूं।

याच समाजाचा आणि लाेकांचाही दुसरा एक पैलू असा आहे की, ते अक्कलवान आहेत, परंतु पैशाने बरेच गरीब आहेत. असा माणूस मिळणे मुश्किल आहे, जाे असे म्हणेल की माझ्याकडे खूप सारी संपत्ती आहे, आणि मला आता काही नकाे. अशी एक अशी असाेशी आहे जी कधीच थांबण्याचे नाव घेत नाही. चहा, भाजी, पान विक्रेता असाे की आणखी काेणी प्रत्येकालाच पैसा हवा आहे. वीज, पाणी आणि ईमान विकणाऱ्याला देखील आणखी पैसा हवाच आहे, आणि ‘साेने पे सुहागा’ म्हणजे आम्ही पैशालाच सुख मानले. हुशारीही समजून घेतली, प्रगतीही. म्हणूनच एकदा माझ्या मनात विचार आला की...

अब यार कहां आदत अपनी
ऐसों वैसों से मिलती है
तारीफ़ कमा कर बैठा हूं, 
रोटी पैसों से मिलती
हैं।