आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्रमक गांगुलीसमोर अनेक कडवी आव्हाने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदीर्घ काळानंतर एक महान खेळाडू क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष झाला आहे. सौरव गांगुली कर्णधार असताना अतिशय आक्रमक स्वभावाचा खेळाडू म्हणून परिचित होता. टीम संकटात असताना तो नेहमीच आदर्श खेळी करायचा. त्याला क्रिकेटच्या भाषेत ‘लिडिंग फ्रॉम द फ्रंट’ म्हणतात. भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच बदल होत आले आहेत. मन्सूर अली खान ‘नवाब ऑफ पटौदी’ यांच्या दृष्टिकोनातून पाहता सामना अनिर्णीत राखण्यासाठी संघ खेळणार नाही. जिंकण्यासाठी प्रयत्न करताना हरलो तरी त्याचे दु:ख राहणार नाही. कारण सतत ड्रॉ सामने खेळल्यामुळे क्रिकेटची लोकप्रियता कमी होत जाते. एका अपघातानंतर एक डोळा गमावल्यानंतरही त्यांनी शतक काढले होते. महान खेळाडू सुनील गावसकर यांनी बलशाली वेस्ट इंडीज संघाला पाणी पाजले. विंडीजची आग ओकणारी गोलंदाजी त्यांनी लीलया खेळून काढली. वेस्ले हॉल, ग्रिफिथ, डेव्हिडसनसारख्या वेगवान गोलंदाजांना त्यांनी सीमापार केले. त्यांच्या काळात फिरकीपटू रिची बेनोही सक्रिय होते. एका सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभवाच्या जवळ होता. एका माजी खेळाडूने रिची बेनोंना सल्ला दिला की, खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांच्या बुटांच्या खुणांवर चेंडू टाकल्यास तो जास्त वळेल. रिची बोने यांनी ही मॅच जिंकून दिली. अनुभव अमूल्य असतो. कपिलदेव आपल्या सुरुवातीच्या काळात केवळ इनस्विंग गोलंदाजी करायचे. एमआरएफ अकादमीत प्रशिक्षण घेताना त्यांनी आऊटस्विंगचे कौशल्य हस्तगत केले. आधी फिरकी गोलंदाजी ही भारतीय गोलंदाजीची ताकद म्हणून ओळखली जायची. मात्र कपिलदेव यांनी वेगवान गोलंदाजीलाही सुवर्ण दिन आणले. आपल्या कारकीर्दीत ते केवळ गोलंदाजी करताना ३० हजार किलोमीटर धावले. त्यात फलंदाजीसाठी धावणे समाविष्ट नाही. एका काळात फिरकीपटू चंद्रशेखर यांना फलंदाज घाबरायचे. त्यांचे मनगट वेगळेच होते. बालपणी झालेल्या एखाद्या आजाराचा हा परिणाम असावा. आमिर खानने आपल्या ‘लगान’ चित्रपटात अशाच फिरकीपटूचे पात्र अजरामर केले. उणिवांनाच बलस्थान बनवणे ही मानवी क्षमतेची खासियत. क्रिकेट नियामक मंडळ आर्थिक रूपाने मजबूत संस्था आहे. गूळ असेल तेथे मुंग्या येणारच. त्यामुळे राजकारण्यांनी ती हातात घेतली. सर्व राजकीय पक्षांचे काही लोक संघटनेशी निगडित आहेत. त्यामुळे त्यांनी संघटनेला संक्षिप्त करून टाकले. क्रिकेट संघटना मित्रांची संघटना बनवली. त्यामुळे गांगुलीच्या आगमनामुळे क्रिकेट संघटनेत परावर्तित होईल. गांगुलीचा मार्ग सोपा नाही. खोडा घालणारे अनेक लोक भोवताली आहेत. त्यांना कव्हर ड्राइव्हद्वारे सीमापार पाठवावे लागणार आहे. गांगुली सुनील गावसकर, राहुल द्रविड, तेंडुलकरसारख्या महान खेळाडूंना संघटनेत मोठे पद देण्याची शक्यता आहे. पुढील विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. आपल्या संघटनेने इंग्लंड क्रिकेट मंडळाकडून धडा घ्यायला हवा. खेळण्याचा निर्णय झाला त्या क्षणी त्यांनी विश्वचषकाची तयारी सुरू केली होती. त्यांनी खेळपट्ट्याही आपल्या संघाला अनुरूप बनवल्या. ऑस्ट्रेलियाच्या एका दूरचित्रवाणी चालवणाऱ्या संस्थेने त्वरित क्रिकेट सुरू केले. पुढच्या टप्प्यात २० षटकांची स्पर्धा सुरू झाली. आता १० षटकांचे सामने सुरू करण्याची चर्चा सुरू आहे. भारतीय आयपीएलने क्रिकेटपटूंना संपत्ती कमावण्याचे दालन खुले केले. हे झटपट क्रिकेट हत्यापट आणि गुन्हेगारीपटांसारखे रंजक बनले आहे. झटपट क्रिकेटने खेळाचे व्याकरणच बदलून टाकले आहे. आपण आशा करू की गांगुली या श्रीमंत मंडळाच्या तिजोरीतील काही पैसा हॉकी, कबड्डी संघटनांना देऊन प्रत्येक खेळाच्या विकासासाठी प्रयत्न करेल.

बातम्या आणखी आहेत...