आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : बॉलिवूडच्या प्रसिद्ध व्यक्तींनी केलेल्या कामाला सर्वचजण फॉलो करतात. अशात सेलेब्सदेखील आपआपल्या पद्धतीने पृथ्वीला वाचवण्यासाठी अभियान राबवत आहेत, ज्यामुळे त्यांच्यामाध्यमाने सेव्ह एन्वायर्नमेंटचा मॅसेज दूर-दूरपर्यंत पसरू शकेल. या पर्यावरण दिनानिमित्त यावेळी आम्ही बॉलिवूड सेलेब्सद्वारे एन्वायर्नमेंटसाठी केलेल्या कामांबद्दल सांगत आहोत. दैनिक भास्करने या सेलेब्ससोबत बातचीत केली, ज्यामध्ये त्यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी मॅसेज दिला.
यांनी केली नवी सुरुवात...
आमिर खान Work :
- पाण्याच्या संरक्षणासाठी पाणी फाउंडेशन चालवत आहेत.
- आपल्या टीमसोबत महाराष्ट्राच्या गावांमध्ये बदल घडवण्यात यशस्वी झाला आहे.
आमिर म्हणाला, क्लायमॅट चेंज एक सत्य आहे आणि आपण त्याला गंभीरतेने घ्यायाला हवे. पाऊस पूर्णपणे फॉरेस्टवर अवलंबून आहे. मागच्या अनेक काळापासून फॉरेस्ट एरिया नष्ट होत आहे. आपण हे अफिले पाहिजे की, आपण जास्तीत जास्त वृक्ष कसे लावू शकू आणि जंगल कसे वाचवले पाहिजे. चांगला पाऊस पाडण्यासाठी वृक्ष असणे गरजेचे आहे. हे एक एन्वायर्नमेंटल सायकल आहे आणि जर क्लायमॅट चेंजसोबत लढायचे असेल तर या सायकलला वाचवणे गरजेचे आहे.
दिया मिर्जा Work :
- भारतातील पहिली संयुक्त राष्ट्र पर्यावरण सद्भावना राजदूत होती.
- वन्यजीव ट्रस्टची राजदूत आहे.
- स्वच्छ भारत मिशनचे यूथ प्रोग्रामचा भाग बनली.
- अभयारण्य नेचर फाउंडेशनची सदस्यदेखील होती. पर्यावरणासाठी सक्रिय अभियानदेखील चालवत आहे.
दिया म्हणाली, सामान्य नागरिक आणि प्रशासनाणेबा मिळून प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. आपण सर्व पर्यावरणाकडे दुर्लक्ष नाही करू शकत. क्लायमॅट चेंजचा परिणाम आपल्या शेतावर, जमिनीवर आणि वॉटर रिसोर्सेजवर आधीपासूनच दिसतो. आपण काही कडक नियम आणि कायदे पर्यावरण वाचवण्यासाठी बनवणे गरजेचे आहे. आपली स्वतःची पाण्याची बॉटल घेऊन चाललो तर जागोजागी विकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बॉटलचे प्रमाण कमी होईल आणि पर्यावरणाची परिस्थिति सुधारायला याची खूप मदत होईल.
अमिताभ बच्चन Work :
- हे स्वच्छ भारत अभियानच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत.
- ते लोकांना स्वयंपाक घरातील कचऱ्याला खतामध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रोत्साहित करतात.
- ते वीज वाचवण्यासाठी अर्थ अवर साजरा करण्याची अपील करतात.
- जलवायु परिवर्तन जागरुकता पसरवतात.
- वर्सोवा क्लीन अप ड्राइव्हमध्येही भाग घेतला आहे.
प्रियांका चोप्रा Work :
- ग्रीन अम्बेसडर आहे.
- यमुनेच्या तटावर प्लास्टिक क्लीन अप ड्राइव्हमध्ये भाग घेतला आहे.
- प्लास्टिकवर पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी अनेकदा आवाज उठवला आहे.
या सोशल कॉजशी जोडले जाण्याच्यावेळी प्रियांका म्हणाली, 'माझी इच्छा नाही की, पुढे चालून माझी मुले आणि नातवंडांनी कधी जंगल पहिलेच नाही आणि अशा जागेवर त्यांना फिरायला जात येऊ नये. जंगलाची सुरक्षा करणे आपले कर्तव्य आहे. आपण टिश्यू पेपर्सचा वापर कमी केला पाहीजे. रस्त्यावर कचरा नाही पसरवला पाहिजे. अशा छोट्या छोट्या सवयीमुळे पुढे नक्कीच बदल येईल. प्रत्येक माणसाने काळजी घ्यावी कि आपण पर्यावरणाचे आपल्या सवयीमुळे काही नुकसान तर करत नाही आहोत ना.
जॅकी श्रॉफ Work :
- वृक्षारोपणासाठी अवेयरनेस आणण्यासाठी खूप काळापासून काम करत आहे.
- ऑर्गेनिक शेती करतो आणि त्यालाच प्रोत्साहन देतात.
केवळ पर्यावरण संरक्षणाचा कार्यक्रमच अटेंड केल्याने काही होत नाही. जर खरंच पर्यावरणासाठी काही करू इच्छितो तर वृक्ष लावले पाहिजेत. जर आपण एखादे फळ खाल्ले तर त्याचे बी फेकण्याऐवजी ते जमिनीत टाकले तर त्याने ते आपोआपच उगवेल. हे सर्व आपण केवळ आपल्यासाठीच नाही तर आपल्या येणाऱ्या पीढ़ीसाठी केले पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे.
मिलिंद सोमन Work :
- एनवायरमेंट अवेयरनेससाठी दिल्लीहुन मुंबईपर्यंत मॅरेथॉन पूर्ण केली.
- ग्रीनाथॉन नावाने कॅम्पेनशी जोडले गेले आहेत.
- आपल्या लग्नामध्ये प्रत्येक पाहुण्याच्या नावाचे एक एक रोप लावून पर्यावरण वाचण्यात योगदान दिले
मिलिंद म्हणाला, लोकांना पर्यावरणाविषयी सांगणे गरजेचे असते. आपण याला वाचवण्यासाठी काय करू शकतो. हा विचार करणेदेखील गरजेचे आहे. मी मॅरेथॉनदरम्यान लोकांना भेटतो, त्यांच्याशी पर्यावरणविषयक गप्पा मारतो. हा लोकांना या त्याच्याविषयी माहिती देण्याचा खूप चांगला मार्ग आहे. विना फुटवेअर मॅरेथॉनमध्ये भाग घेतल्यानेही पर्यावरण जवळून समजून घेण्याची एक चांगली मिळते.
यांचे कंट्रीब्यूशनदेखील आहे खास...
राहुल बोस...
- 2009 मध्ये कोपेनहेगनमध्ये संयुक्त राष्ट्राचे जलवायु संमेलनामध्ये ऑक्सफॅमचे प्रतिनिधित्व केले.
- जलवायु परिवर्तनच्या मुद्यावर फाउंडेशन चालवत आहे.
नंदिता दास...
- सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरनमेंटसोबत मिळून पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी काम केले.
- मुलांसाठी पावसाचे पाणी साठवण्यावर शैक्षिक लघु चित्रपटाची निर्मिती केली.
आपल्या कामाने सेट केले एग्जाम्पल...
काही सेलिब्रिटी असे आहेत ज्यांनी आपल्या खाजगी आयुष्यात सेव्ह एनवायरमेंटसाठी एक्जाम्पल सेट केले.
रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण...
आपल्या रिसेप्शनमध्ये बायोडिग्रेडेबल टेबलवेयरचा वापर केला. जेवणाची भांडी ऊसाच्या चोथ्यापासून बनलेली होती. त्यांच्या पार्टीमधून कोणताच कचरा असा नाही निघाला, ज्याने पर्यावरणाचे काही नुकसान होईल.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली...
विराट कोहली आणि अनुष्का शर्मानेदेखील मॅसेज देत आपल्या वेडिंग इन्व्हिटेशनमध्ये पाहुण्यांना एक एक छोटे रोपटे पाठवले होते.
अजय देवगन...
गुजरातच्या पाटन जिल्ह्यात एक सौर संयंत्र स्थापित करण्यामध्ये मदत केली. फटाक्यांवर प्रतिबंध लावण्याचा मुद्दा मांडला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.