• Home
  • News
  • Many celebrities including Hrithik and Saniya attendants in Farah Khan's lunch party

Celebs Party / फराह खानने केले होते लंच पार्टीचे आयोजन; या पार्टीत ऋतिक आणि भूमीसह अनेक सेलिब्रिटीजनी लावली हजेरी, पाहा पार्टीचे फोटोज

बॉलीवूड सेलिब्रिटीजसोबत सानिया मिर्झाला करण्यात आले आमंत्रित
 

दिव्य मराठी वेब

Jul 16,2019 01:30:35 PM IST

बॉलीवूड डेस्क - कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानने आपल्या घरी एका लंच पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली. फराहने स्वतः फोटो शेअर याची माहिती दिली. फोटोत ऋतिक रोशन, नेहा धूपिया, अंगद बेदी, कृती सेनॉन, भूमी पेडणेकर, आदिती राव हैदरी, मनीष पॉल, डायना पेंटी आणि सानिया मिर्झासह इतर कलाकार दिसत आहेत.


या पार्टीचे आणखी फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.....

या पार्टीत सोनू सूदने सर्वांसोबत सेल्फी घेतली. या सेल्फीत दिग्दर्शक विकास बहल, अंगद बेदी, कृती सेनॉन, डायना पेंटी, भूमि पेडणेकर, फराह खान, पत्रलेखा, आदिती राव हैदरी आणि सानिया मिर्झासह इतरही दिसत आहे.पार्टीत पत्रलेखा आणि आदितीचा वेगळा अंदाज पाहण्यात मिळाला. आदिदीने लाल टीशर्टसोबत लूज जीन्स परिधान केली होती. तर पत्रलेखा पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली.लुका-छुपी सारखा हिट चित्रपट दिल्यानंतर कृती सेनॉन सक्सेस एन्जॉय करत आहे. कृती सेनॉनने पार्टी दरम्यान लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता.फराह आणि सानिया यांची चांगलीच जवळीक आहे. या पार्टीत सानियाला देखील आमंत्रित करण्यात आले होते. तिने पिवळ्या रंगाच्या टॉपसोबत निळी जीन्स परिधान केली होती. तर फराह खान टॉप आणि पॅन्ट्ससोबत कॅज्युअर लुकमध्ये दिसली.
X
COMMENT