National flood / मुसळधार पावसाचा त्रिपूराला फटका, पुरामुळे 1 हजारांपेक्षा जास्त घरे उद्धवस्त


धलाई जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान, पण कोणतीही जीवितहानी नाही

दिव्य मराठी वेब टीम

May 26,2019 06:57:00 PM IST

अगरतळा(त्रिपुरा)- येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच त्रिपुराची मानु, जुरी, काकती या नद्यां ओसंडून वाहत असल्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. पुरामुळे, उत्तर त्रिपुरा भागासोबतच उनाकोटि आणि धलाई जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे. सरकारी आकड्यांनुसार पुरामुळे आतापर्यंत 1039 घरे उद्धवस्त झाले आहेत. नागरिकांना आपला जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी पलायन करावे लागत आहे.


कोणतीही जीवितहानी नाही
पुरामुळे त्रिपुराच्या 8 जिल्ह्यातील परिस्थिती खूप गंभीर आहे, पण आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नॅशनल डिझास्टर रिस्पांस फोर्स(एनडीआरएफ) सोबत त्रिपुरा स्टेट रायफल आणि राज्य, जिल्हा प्रशासनाचे दल बचाव कार्याचे काम करत आहे. 9 स्पीड आणि 40 रेस्क्यू बोटसुद्धा कार्यरत आहेत. एनडीआरएफनुसार, मानु, जुरी आणि काकती नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडला आहे. तसेच, त्यामुळे अनेक घरांतील लोकांना बाहेर निघता येत नाही. बचाव कार्यामध्ये असलेले दल लोकांना काढून सुरक्षित ठिकाणी पाठवत आहे.

धलाई जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान
अधिक माहितीनुसार, या पुरामुळे सर्वात जास्त नुकसान धलाई जिल्ह्यामध्ये झाले आहे. उनाकोटिमध्ये 358 घर उद्धवस्त झाले असून उत्तर त्रिपुरामध्ये ही संख्या 381 एवढी आहे. यादरम्यान शासनाने सुरू केलेल्या राहत कँपमध्ये सध्या 700 पेक्षा जास्त लोक आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आताही हवेची गती 30-40 किमी प्रति तास आहे. सध्यातरी हवामानात बदल होण्याची शक्यता नाही.

X
COMMENT