विधानसभा 2019 / पक्षांतरवीर : उदयनराजे भोसलेंसह अनेक दिग्गजांनी पंचवीस वर्षांत किमान तीनदा बदलले झेंडे

या वेळी पक्षांतरे करणाऱ्यांनी पाचही निवडणुकांमध्ये सोयीप्रमाणे ‘घरे' बदलल्याचेही आकडेवारी सांगते

दिव्य मराठी

Sep 22,2019 10:34:00 AM IST

दीप्ती राऊत

नाशिक - सत्ताधारी भाजप-शिवसेनेत पक्ष प्रवेश करणाऱ्या नेत्यांची पक्षांतरे हा विधानसभा निवडणुकीतील चर्चेचा मुद्दा ठरतो आहे. परंतु यातील बहुतांश नेत्यांनी गेल्या २०-२५वर्षांत अनेक वेळा पक्षांतरे केल्याचा इतिहास साक्षीदार आहे. भाजपच्या चलनी करिष्म्यामुळे हे नेते आपापले पक्ष सोडून धावणाऱ्या गाडीत चढत आहेत. परंतु, त्यांच्यासाठी हा अनुभव नवीन नाही. यापूर्वीच्या पाचही विधानसभा निवडणुकांत या नेत्यांनी अनेकदा पक्षांतरे केल्याचे दिसते. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे आणि माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजप -शिवसेनेत प्रवेश केल्यावर त्यांची पक्षांतरे नसून त्यांची ‘घर वापसी' असल्याचे बोलले जात आहे. अर्थात या वेळी पक्षांतरे करणाऱ्यांनी पाचही निवडणुकांमध्ये सोयीप्रमाणे ‘घरे' बदलल्याचेही आकडेवारी सांगते. विशेष म्हणजे, युती शासन असो वा आघाडी सरकार, सत्तेच्या दिशेने या नेत्यांनी झेंडे बदललेे.

उदयनराजे भोसले
> १९९५ भाजप
> १९९९ भाजप
> २००४ अपक्ष
> २००९ राष्ट्रवादी
> २०१४ राष्ट्रवादी
> २०१९ भाजप

भास्कर जाधव
> १९९५ शिवसेना
> १९९९ शिवसेना
> २००४ अपक्ष
> २००९ राष्ट्रवादी
> २०१४ राष्ट्रवादी
> २०१९ शिवसेना

गणेश नाईक
> १९९५ शिवसेना
> १९९९ राष्ट्रवादी
> २००४ राष्ट्रवादी
> २००९ राष्ट्रवादी
> २०१४ राष्ट्रवादी
> २०१९ भाजप

हर्षवर्धन पाटील
> १९९५ अपक्ष
> १९९९ युतीत मंत्री
> २००४ काँग्रेस
> २००९ काँग्रेस
> २०१४ काँग्रेस
> २०१९ भाजप

सुरेश धस
> १९९५ राष्ट्रवादी
> १९९९ भाजप
> २००४ राष्ट्रवादी
> २००९ राष्ट्रवादी
> २०१४ राष्ट्रवादी
> २०१९ भाजप

राधाकृष्ण विखे
> १९९५ अपक्ष
> १९९७ युतीत मंत्री
> १९९९ काँग्रेस
> २००४ काँग्रेस
> २००९ काँग्रेस
> २०१४ काँग्रेस
> २०१९ भाजप

X
COMMENT