आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंध्र प्रदेशात TDP MLA सह माजी आमदाराची गोळ्या झाडून हत्या, नक्षलवाद्यांनी केला हल्ला -पोलिस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टनम - आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टनम जिल्ह्यात सत्ताधारी तेलुगू देसम पार्टीच्या दोन नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (TDP) चे आमदार के. सर्वेश्वर राव आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांचा नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून खून केला. विशाखापट्टनमपासून 125 किमी दूर असलेल्या थुटांगी गावात ही घटना घडली. राव अराकू विधानसभा मतदार संघातून आमदार होते. अराकू येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना त्या दोघांना अचानक नक्षलवाद्यांनी अडवले आणि त्यांच्यावर अगदी जवळून हल्ला केला. 


यापूर्वीच मिळाल्या होत्या धमक्या
पोलिसांनी सांगितले, की राव 2014 मध्ये वायएसआर काँग्रेस पार्टीकडून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या अराकू विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी टीडीपी नेते सोमा यांनी पराभूत केले होते. 2016 मध्ये राव यांनी टीडीपीमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला होता. सोमा आणि राव या दोघांना यापूर्वीच नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यात रविवारी त्या दोघांना मोठ्या संख्येने आलेल्या नक्षलवाद्यांनी वाटेतच अडवले आणि दोघांवर गोळीबार केला. 

 

बातम्या आणखी आहेत...