आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रा. साईबाबाला सोडवण्याचे माओवाद्यांचे कटकारस्थान, पोलिसांची हायकोर्टात धक्‍कादायक माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - नागपूर कारागृहात कैदेत असलेला माओवादी नेता प्रा. साईबाबा याच्या सुटकेसाठी माओवाद्यांचे प्रयत्न सुरूच अाहेत. त्याला कसेही करून आंध्र प्रदेशातील कारागृहात स्थानांतरित करायचे व नंतर तेथून त्याची सुटका करायची, अशी माओवाद्यांची रणनीती असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.


भीमा कोरेगावप्रकरणी नागपुरात अटक माओवादी नेता सुरेंद्र यांच्या पत्रातून ही बाब उघड झाली आहे. नागपूर खंडपीठात पोलिसांकडून सादर दस्तऐवजातून त्याची माहिती देण्यात आली आहे. देशद्रोहाच्या आरोपावरून गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रा. साईबाबा व त्याच्या साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. कारागृहातून साईबाबा याची सुटका करण्यासाठी त्याचे न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून आंध्रातील कारागृहात स्थानांतरण करणे व तेथून त्याची कुठल्याही पद्धतीने सुटका करण्याचे माओवाद्यांचे प्रयत्न असल्याचे पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...