आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिगत सदस्यांसह माअाेवाद्यांनी पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचला, दाेषारोपपत्रात पोलिसांचा उल्लेख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - बंदी असलेल्या सीपीआय माओवादी या संघटनेच्या ईस्टर्न रिजनल ब्युरो (ईआरबी) समितीचा सचिव केंद्रीय समिती सदस्य किशन गा ऊर्फ प्रशांत बोस आणि रोना विल्सन यांच्यासह इतर भूमिगत सदस्यांनी पंतप्रधानांच्या हत्येचा कट केल्याचे जप्त करण्यात अालेल्या पुराव्यांच्या अाधारे स्पष्ट झाल्याचे पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेच्या अनुषंगाने सादर केलेल्या दोषारोपपत्रात नमूद केले आहे.  

 
शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी पार पडलेल्या एल्गार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमात झालेल्या हिंसाचाराच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यातील १० आरोपींच्या विरोधात गुरुवारी पुणे पोलिसांनी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

 

अटकेतील सुधीर ढवळे, रोना विल्सन, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, अॅड. सुरेंद्र गडलिंग व भूमिगत असलेले कॉ. एम ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे, किशनदा ऊर्फ प्रशांत बोस, प्रकाश ऊर्फ नवीन ऊर्फ  रितुपर्ण गोस्वामी, कॉ. दीपू, कॉ. मंगलू अशा १० जणांविरोधात ५ हजार १६० पानी दोषारोपत्र दाखल केले. दोषारोपपत्रात नावे असलेल्या आरोपींचा पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचण्यात, शासनव्यवस्था व नागरिकांविरोधात युद्ध पुकारण्यासाठी सीपीआय (एम) या संघटनेच्या व्यापक कटकारस्थानाचा भाग म्हणून व त्या उद्देशाने अवैध हत्यार व दारूगोळा मिळवण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.   प्रशांत बोस यांच्यासोबत रोना विल्सन यांचे ई-मेलद्वारे झालेले संभाषण पोलिसांना मिळाले होते. त्याबाबतचे एक पत्रदेखील पोलिसांच्या हाती आले होते.    

 

राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणेच हत्या घडवण्याचा कट  
पंतप्रधान राजीव गांधींची ज्या पद्धतीने स्फोट घडवून हत्या करण्यात आली होती, त्याच पद्धतीने मोदींच्या हत्येचा कट केल्याचा पत्रात उल्लेख होता. मात्र, आरोपींच्या वकिलांकडून ही सर्व पत्रे खोटी असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, अटकेतील आरोपींकडून मिळालेली कागदपत्रे, इलेक्ट्राॅनिक डिव्हाइसमधील डाटा आणि गुप्त पद्धतीने झालेल्या बैठकांच्या मिनिट्सवरून संघटनेतील माओवाद्यांनी पंतप्रधानांच्या हत्येचा कट केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहाेचले आहेत.

 

युद्धाचा अभ्यास केला, जातीनिहाय नाही : पाटील

काेरेगाव भीमा या ठिकाणी पेशवे व ब्रिटिश सैनिकांच्यात नेमके कशा प्रकारे युद्ध झाले याबाबत विविध कागदपत्रे मिळवत व पुस्तकांचे वाचन करून युद्धाचा सखाेल अभ्यास केला. मात्र, या सैन्यात काेणत्या जातीचे किती सैन्य हाेते याबाबत जातीनिहाय अभ्यास मी केला नसल्याची साक्ष पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी उलटतपासणीदरम्यान न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्यासमाेर शुक्रवारी नाेंदवली. बचाव पक्षाचे वकील किरण चिन्ने यांनी पाटील यांना विविध प्रश्न विचारले.

बातम्या आणखी आहेत...