Home | Maharashtra | Vidarva | Akola | maratha kranti morcha protest in akola

पालकमंत्र्यांच्या घराला घातला घेराव; अारक्षण मुद्द्यावरून विचारला जाब

प्रतिनिधी | Update - Aug 06, 2018, 01:09 PM IST

मराठा अारक्षणासह इतरही मागण्यांसाठी रविवारी सकल मराठा समाजातर्फे जनअांदाेलनाअंतर्गत मराठा पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री

 • maratha kranti morcha protest in akola

  अकोला- मराठा अारक्षणासह इतरही मागण्यांसाठी रविवारी सकल मराठा समाजातर्फे जनअांदाेलनाअंतर्गत मराठा पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डाॅ.. रणजित पाटील यांच्या घराला घेराव घालत ठिय्या अांदाेलन केले. अांदाेलकांनी पालकमंत्र्यांना १८ मुद्द्यांवरून जाब विचारला. यावर पालकमंत्र्यांनीही 'मी अाधी समाजाचा, तर नंतर सरकारचा प्रतिनिधी' असल्याचे स्पष्ट करीत मराठा िवद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहाचा प्रश्न १५ दिवसात मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी निवेदन स्वीकारत अांदाेलकांनी अाणलेलं बेसन-भाकरीचं जेवण त्यांच्यासाेबत रस्त्यावर केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात अाला हाेता.


  जि. प. कर्मचारी भवन येथे ५ अाॅगस्टला ११ वाजता मराठा बांधव जमा झाले. येथे जनअांदाेलनाचे स्वरूप विषद केले. अपमानास्पद घाेषणा देऊ नये, शिवराळ भाषेचा वापर करु नये, शांततेने अांदाेलन करावे, अशा सूचना दिल्या.


  सोयीस्कर पाठ, अन साेयीचा सहभागही : यापूर्वी ३ अाॅगस्टला भाजप खासदार संजय धाेत्रे,अामदार रणधीर सावरकर यांच्या घरासमोर ठिय्या अांदाेलन केले हाेते. जिल्ह्यात पालकमंत्री, खासदार यांचे दाेन गट अाहेत. या दाेन्ही नेत्यांचे समर्थक -कार्यकर्ते मराठा समाजात कमी नाहीत. त्यामुळे खासदार व अामदार सावरकर यांच्या घरासमोर झालेल्या अांदाेलनाकडे काही समर्थकांनी पाठ फिरवली हाेती. रविवारी पालकमंत्री, गृहराज्यमंत्री डाॅ.. पाटील यांच्या घरासमोरील अांदाेलनाला काही मुख्य कार्यकर्त्यांची गैरहजेरी अनेकांना खटकली, काही जण (िवराेधी राजकीय पक्षांतील नेते ) सहभागीही झाले हाेते. सोयीस्कर फिरवलेली पाठ.साेयीचा नोंदवलेला सहभाग दाेन्ही ठिकाणी झालेल्या अांदाेलनाच्या वेळी दिसला. यातून अनेकांची राजकीय महत्त्वाकांक्षा दिसून येत असल्याची चर्चा हाेती. पालकमंत्र्यांसाेबत जेवणताना अांदाेलकांपैकी काहींनी फाेटाे काढण्यात धन्यता मानून घेत हाेते. त्यामुळे अापण अांदाेलनासाठी अालाे अाहाेत, याचे भान ठेवण्याचे अावाहन ज्येष्ठांना करावे लागले.


  अांदाेलकांकडून पालकमंत्र्यांना प्रश्न िवचारताना काहींनी 'चर्चेसाठी पालकमंत्री घराबाहेर तरी अाले', असे म्हटल्यानंतर अनेकांनी टाळ्या वाजवल्या. खा. धाेत्रे यांच्या घरासमोर झालेल्या अांदाेलनावेळी अांदाेलकांशी चर्चेसाठी, निवेदन स्वीकारण्यासाठी काेणीच घराबाहेर अाले नव्हते, हे येथे उल्लेखनीय.


  पालकमंत्र्यांना त्यांच्या घरासमोरच अांदाेलकांनी विविध प्रश्नांवर जाब विचारला. यापूर्वी मराठा खासदार व अामदारांना १८ प्रश्न विचारले हाेते. पालकमंत्र्यांनाही तसाच जाब विचारला गेला. पालकमंत्र्यांच्या घरासमोर अांदाेलक पाेहाेचण्यापूर्वीच पाण्याच्या कॅन ठेवल्या हाेत्या. अांदाेलन सुरु झाल्यानंतर कॅन अांदाेलकांना दिल्या. चहाची व्यवस्था केली. मात्र हे चहा व पाणी अांदाेलकांनी नाकारले; नंतर अांदाेलकांनी स्वत: पाण्याची व्यवस्था केली. अांदाेलनानंतर जेवणाच्या कार्यक्रमात पालकमंत्री सहभागी झाले. काही अांदाेलकांनी पालकमंत्र्यांना घास भरवण्यात धन्यता मानली. काहींनी पालकमंत्र्यांच्या मांडीला-मांडी लावून जेवणाचा अास्वादही घेतला. मात्र बहुता:श अांदाेलकांना ते अावडले नसल्याने त्यांनी तेथे नाराजीचा सूर तेथे अाळवला.


  वसतिगृहासाठी पालकमंत्र्यांकडून जागेची पाहणी
  मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आगरकर विद्यालयाला भेट देऊन जागेची पाहणी केली. या वेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान यांची उपस्थित होती.वसतिगृह सुविधायुक्त राहणार आहे.


  पालकमंत्र्यांनीही त्यांना सुनावले
  काही अांदाेलकांनी चर्चेमध्येच या सरकारने काय केले, असा प्रश्न िवचारण्यास प्रारंभ केला. पालकमंत्री डाॅ. पाटील यांनीही अारक्षणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून रखडला असून, यापूर्वी काेणी काय केले, याबाबत मी राजकीय चर्चा, तसे उत्तर देऊ इच्छित नाही. 'हे काम करताे', असे राजकीय उत्तर मला द्यायचे नसून, वसतिगृहासाठी दाेन जागांची पाहणी झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जनता दरबारात याच मागण्यांवर स्वतंत्र वेळ देऊन चर्चा करण्यात येईल, असे ते म्हणाले. या वेळी तेथे जिल्हाधिकारी उपस्थित हाेते.

Trending