Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | maratha kranti morcha protest in akola and aurangabad

आंदोलनाची धग कायम: औरंगाबादेत थाळीनाद तर अकोल्‍यात गोंधळींसोबत आंदोलकांचा जागर

प्रतिनिधी | Update - Aug 03, 2018, 06:10 PM IST

मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात सकाळी १० वाजता आमदार सावे यांच्या औरंगाबादेतील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले.

 • maratha kranti morcha protest in akola and aurangabad

  औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी आमदारांनी विधिमंडळात तर खासदारांनी संसदेत आवाज उठवून तातडीने तोडगा काढावा, या प्रमुख मागणीसाठी लक्षवेधण्यासाठी शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात सकाळी १० वाजता आमदार सावे यांच्या औरंगाबादेतील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले. सावे, खैरे, बागडे आरक्षणाच्या प्रमुख प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या नावे हाय हाय च्या घोषणा देवून मराठा बांधवांनी आपला रोष व्यक्त केला.

  पंधरा दिवसांपासून सुरु असलेले ठिय्या आंदोलन, आत्मबलिदान, आक्रोश, ठोक आंदोलनानंतरही ठोस असे काही निर्णय सरकारने अद्याप घेतलेले नाही. त्यामुळे आंदोलनाची धग दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे. याचे भान लोकप्रतिनिधींना यावे म्‍हणून लोप्रतिनिधींच्या घर, कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे, असे आंदोलकांनी सांगितले. याअंतर्गत ३ ऑगस्ट रोजी सावे यांच्या कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. निवेदन स्वीकारण्यासाठी सावे उपस्थित नसल्यामुळे आंदोलकांचा पार चढला होता. याचा रोष त्यांनी घोषणा देवून व्यक्त केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव व पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारत मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा असल्याचे व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध असल्याचे अश्वासित केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

  अकोल्‍यात गाेंधळींनीही मांडला जागर
  अकोल्‍यात भाजप खासदार संजय धाेत्रे व अामदार रणधिर सावरकर यांच्या घरासमाेर ठिय्या अांदाेलन करीत आंदोलकांनी १८ प्रश्नांची सरबत्ती केली. या प्रश्नांवर अांदाेलकांनी स्पष्टीकरणाची मागणी केली. अांदाेलकांनी घाेषणा दिल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला हाेता. अांदाेलकांनी खासदार धाेत्रेंच्या घरावर १८ प्रश्नांचे पत्र लावले, तर अामदार सावरकरांच्या पत्नी मंजुषा सावरकर यांनी मराठा बांधवांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी अांदाेलकांनी गाेंधळींसाेबत जागरही मांडला

  या प्रश्‍नांवर मागितले स्पष्टीकरण

  खासदार व अामदारांच्या घरासमाेर पुढीलप्रमाणे अांदाेलकांनी प्रश्नांची सरबत्ती केली.
  १) मराठ्यांनी शांततामय मार्गाने काढलेल्या माेर्चानंतर कायदे मंडळात काेणती भूमिका मांडली?
  २) अण्णासाहेब पाटील अार्थिक विकास महामंडळासाठी अर्थसंकल्पात किती तरतूद केली ?
  ३) मराठा विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी जागा निश्चित झाली काय?
  ४) दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क परत का केले नाही, शिष्यवृत्ती का दिली नाही?
  ५) राजाराम महाराज मंडळासाठी अार्थिक तरतूद किती केली?
  ६) चार वर्षात मराठा समाजासाठी अापण काय केले?
  ६) मराठा अारक्षाबाबत अापली भूमिका काय?

  शेतीच्या प्रश्नांवर विचारला जाब
  अांदाेलकांनी ३ अाॅगस्ट राेजी शेतीच्या प्रश्नावरुन स्पष्टीकरण मागितले. मराठा शेतकऱ्यांच्या अात्महत्यांना अापण जबाबदार नाहीत काय, अापल्यावर गुन्हा दाखल का करुन नये ?, अापण संबंधित कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या काय, स्वामीनाथन अायाेगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला भाव दिले काय, कर्जमुक्तीतून वन टाईम सेटलमेंटनुसार झालेली तडजाेड अाहे काय, साेने तारण कर्जमाफिची सद्यस्थिती काय अाहे, बोंड अळीची संपूर्ण अार्थिक मदत केव्हा मिळेल, दुष्काळी अनुदानाचे काय झाले, शेतीतील तंत्रज्ञानाचे स्वातंत्र मिळणार काय, शेतकरी विराेधी कायदे रद्द करण्याबाबत कायदेमंडळात अापण काेणती भूमिका मांडली अादीं प्रश्न विचारण्यात अाले.

  पुढील स्‍लाइडवर पाहा, आंदोलनाचे फोटो...

 • maratha kranti morcha protest in akola and aurangabad
 • maratha kranti morcha protest in akola and aurangabad

Trending