आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - मुंबईत सोमवारी मराठा क्रांती माेर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनातच मराठा अारक्षणाचा अध्यादेश काढून तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी मोर्चाची आहे. मात्र मंत्रालय परिसरात धडकलेल्या काही मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. हे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत होते. त्यांना पोलिसांनी रोखले.
दरम्यान, राज्यरातून निघालेली 'संवाद यात्रा' साेमवारी मुंबईत धडकणार त्याआधीच मराठा बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. पुणे, नाशिक सह राज्यातील अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मराठा अारक्षण व अांदाेलनातील गुन्हे मागे घेऊन पाेलिसांकडून हाेणारी दडपशाही थांबवावी, कर्जमुक्ती, हमीभाव, स्वामिनाथन अायाेगाच्या शिफारशी स्वीकारणे, अॅट्राॅसिटी कायद्याचा गैरवापर थांबवून त्यात सुधारणा करावी अादी मागण्यांंबाबत जनजागृती करण्यासाठी मराठा क्रांती माेर्चाने राज्यभरात १६ नाेव्हेंबरपासून संवाद यात्रा सुरू केली होती. ती सोमवारी मुंबईत धडकली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.