आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चाचे क्रांती चौकातील ठिय्या आंदोलन तूर्तास मागे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाने क्रांती चौकात १९ जुलैपासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन २८ दिवसांनंतर मागे घेण्याचा निर्णय स्वातंत्र्यदिनी मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर समन्वयकांच्या वतीने डॉ. शिवानंद भानुसे यांनी ही घोषणा केली.

 

राज्य सरकारने या आंदोलनादरम्यान मराठा समाजासाठी काही घोषणा केल्या आहेत. त्यात आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्याचाही समावेश आहे. या घोषणांची सरकारने अंमलबजावणी करावी. तसे झाले नाही तर १५ ते २० दिवसांत मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करून या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा आणि पुढील वाटचाल ठरवण्यात येईल, असेही भानुसे म्हणाले. या बैठकीला विजय काकडे पाटील, रवींद्र काळे, चंद्रकांत भराड, सुरेश वाकडे, रमेश गायकवाड, अशोक मोरे, ज्ञानेश्वर गायकवाड,रवींद्र वाहटुळे, रेखा वाहटुळे, शिवा पाटील, अंकित चव्हाण,श्रद्धा पवार, प्रशांत इंगळे, गजानन पाटील, अमोल साळुंके, रेणुका सोमवंशी यांच्यासह मोठ्या संख्यने समन्वयक उपस्थित होते.

 

बातम्या आणखी आहेत...