आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड, उस्मानाबाद, जालन्यात शांततेत तर नांदेड, परभणी, हिंगोली, लातुरात हिंसेचे गालबोट; बसस्थानकात तोडफोड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील गल्लेबोरगाव (ता. खुलताबाद) येथे आंदोलकांनी टायर जाळले. छाया : वैभव किरगत - Divya Marathi
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील गल्लेबोरगाव (ता. खुलताबाद) येथे आंदोलकांनी टायर जाळले. छाया : वैभव किरगत

औरंगाबाद- मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंगोली, परभणी आणि नांदेड या तीन जिल्ह्यांत अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसाचाराचे गालबोट लागले.  सेनगाव तालुक्यात आंदोलकांनी तीन वाहने जाळली.  शुक्रवारी बसेस, शाळा व महाविद्यालये नियमितपणे सुरू होतील. 


नांदेड : उमरीत रेल्वेस्टेशन, बसस्थानकात जमावाचा गाेंधळ
जिल्ह्यात उमरी, हदगाव आणि देगलूर येथे आंदोलनाने हिंसक वळण घेतले. उमरी रेल्वे स्टेशन आणि बसस्थानकाची तोडफोड करण्यात आली. मोंढा भागात पानटपरी आणि छोट्या चार हॉटेलला आग लावण्यात आली.  दुपारी मोठा जमाव उमरी बसस्थानकात  घुसला. त्यांनी बसस्थानकातील सर्व काचेची तावदाने फोडली.  वाहतूक नियंत्रकाच्या कक्षातील सर्व टेबल, खुर्च्या, पंख्यांसह  नियंत्रण कक्षाच्या सर्व काचा फोडल्या. त्यानंतर आंदोलक रेल्वे स्टेशनमध्ये शिरले. तेथील ऑटोमॅटिक तिकीट मशीनसह सर्व डिस्प्ले बोर्ड फोडले. टीव्हीही फोडला. तर  मोंढा भागातील एक पानठेला चौकात आणून पेटवूून दिला. ती आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी आली असता तिचीही तोडफोड करण्यात आली.  या सर्व घटनांचे फोटो काढणाऱ्यांचे मोबाइलही जमावाने  फोडले. शहरातील काही दैनिकांच्या कार्यालयांवर हल्लाही झाला. 


रात्रीपासूनच आंदोलन
लोहा तहसील कार्यालयातील रेकॉर्डला बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमाराला रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.  या आगीत जातीच्या संचिका जळाल्या. नांदेड शहरात गुरुवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. चंदासिंग कॉर्नरवर आंदोलकांनी रस्त्यावर स्वयंपाक करून पंगतीत जेवण केले.    देगलूर येथे सकाळी ११ वाजता  २५ ते ३० जणांनी घोषणाबाजी करीत आगारात उभी असलेल्या बसची (एमएच २० बीएल ३९०३) समोरची काच फोडली. हदगाव येथेही जवळपास ५० ते ६० जणांचा जमाव बसस्थानकात घुसला. त्यांनी घोषणाबाजी करीत हदगाव आगारात उभ्या असलेल्या गाड्यांवर तुफान दगडफेक केली. यात ६ गाड्यांचे काच फुटले.  


उस्मानाबाद :  २८६ जणांनी केले रक्तदान
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.   दरम्यान, उस्मानाबादेत तरुणांनी ‘नको हत्या, नको आत्महत्या, करू रक्तदान, देऊ जीवदान’मोहीम राबवून रक्तदानाचा अभिनव उपक्रम राबवला. यामध्ये ३०० हून अधिक तरुणांनी रक्तदान केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन झाले.   दरम्यान, रात्री उशिरा तामलवाडीजवळ अज्ञात समाजकंटकानी खासगी आराम बसवर दगडफेक केली. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मराठवाड्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसाचाराचे गालबोट...

बातम्या आणखी आहेत...