आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखे आंदोलन: महाराष्‍ट्र बंदमुळे रस्‍त्‍यावर अडकलेल्‍या प्रवाशांना मराठा समाजाकडून जेवण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरखेड (यवतमाळ) - मराठा आरक्षणासाठी राज्‍यभरात सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरूवारी महाराष्‍ट्र बंद पुकारण्‍यात आला. यानिमित्‍ताने राज्‍यभरातील रस्‍त्‍यांवर ठिकठिकाणी चक्‍क जाम व ठिय्या आंदोलन करण्‍यात आले. त्‍यामुळे बंदची कल्‍पना नसलेल्‍या अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला. तास-तासभर त्‍यांना रस्‍त्‍यावर अडकून रहावे लागले. मात्र उमरखेड तालुक्‍यात बंद कसा असावा याचे एक आगळेच उदाहरण मराठा आंदोलकांनी दाखवून दिले आहे.
 
उमरखेड तालुक्‍यातील नागपूर-बोरी-तुळजापूर मार्गावर गुरूवारी सकाळी 7 वाजल्‍यापासून आंदोलकांनी चक्‍काजाम केला होता. यामुळे या मार्गावर वाहनांच्‍या लांबच लांब रांगा लागल्‍या होत्‍या. आंदोलनामुळे हॉटेल्‍स-दुकाने बंद असल्‍यामुळे अनेक प्रवाशांची खाण्‍यापिण्‍याची गैरसोय होत होती. प्रवाशांची ही अडचण ओळखून मराठा समाजाकडून या प्रवाशांना जेवण देण्यात आले. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर जेवणाची पंगत पाहायला मिळाली. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून रस्ता अडवण्यात आल्यानं ट्रक, बस, खासगी वाहनांमधील प्रवासी अडकून पडले आहेत. या प्रवाशांना आता मराठा समाजाकडून जेवण पुरवल्या जात आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...