Nagpur / मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात दिलेले आरक्षण कायम

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आरक्षण दिल्याने खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती

दिव्य मराठी नेटवर्क

Jun 21,2019 08:24:00 AM IST

राज्य सरकारने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा समाजाला ईबीसी श्रेणी तयार करून आरक्षण देण्याचा निर्णय गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर रोजी घेतला होता. त्यासाठी अध्यादेशही काढला. याचे विधेयकात रुपांतर करणे आवश्यक असल्याने गुरुवारी हे विधेयक मंजूर करण्यात आले. विधेयक मंजूर झाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.


मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि एसईबीसी श्रेणी अंतर्गत शैक्षणिक संस्था आणि नोकरीत १६ टक्के आरक्षण लागू केले. मात्र पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आरक्षण दिल्याने खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवल्याने सरकारची कोंडी झाली होती. मात्र मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने अध्यादेश काढला. या अध्यादेशाचे विधेयकात रुपांतर होणे आवश्यक होते.

X
COMMENT