आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा अारक्षण प्रक्रिया महिनाअखेरपर्यंत: वैधानिक बाबींची तत्काळ पूर्तता- मुख्यमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मागासवर्ग अायाेगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या महिनाअखेरपर्यंत वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून हा मुद्दा मार्गी लावला जाईल, अशी मािहती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. अकोला जिल्ह्यातील विविध कामांचा अाढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत प्रामुख्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आल्यानंतर यावर भाष्य केले. 


अारक्षणासह इतर मागण्यांसाठी काही दिवसांपासून अांदाेलने सुरू अाहेत. यात प्रामुख्याने अारक्षणाचा मुद्दा कायदेशीरदृष्ट्या टिकावा म्हणून मागासवर्ग अायाेगाकडून राज्य सरकारने अहवाल मागवला अाहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा झाल्यावरच पुढील कार्यवाही सुरू होईल दरम्यान, हा अहवाल १५ नाेव्हेंबर राेजी राज्य सरकारकडे सोपवला जाईल.

 

अहवाल मिळाला नाही  
राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अद्याप सरकारला प्राप्त झाला नसल्याचे सांगून अहवालात नेमक्या कोणत्या बाबी किंवा शिफारशींचा समावेश आहे,  हे तूर्त तरी माहिती नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, मराठा अारक्षणाबाबत वैधानिक बाबींची पूर्तता निश्चितपणे हाेणार असून १५ िदवसांत हा मुद्दा निकाली निघेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

 

काेपर्डीत १८ नाेव्हेंबरला मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक पुढील दिशा ठरवणार

मराठा अारक्षणाच्या संदर्भात गैरसमज पसरवून फूट पाडण्याचा प्रयत्न होत अाहे. ताे दूर करण्यासाठी अाता सर्वच संघटना सरसावल्या अाहेत. काेपर्डी घटनेपासून मराठा समाज एक झाला. अाता परत समाजाला एकत्रित येण्याची गरज लक्षात घेऊन १८ नोव्हेंबरला काेपर्डी येथे मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक घेण्यात येणार अाहे. यानंतर अांदाेलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येईल. ही माहिती मराठा क्रांती ठाेक माेर्चा समन्वयक अाबासाहेब पाटील यांनी दिली. कुणबी अाणि मराठा अाता वेगवेगळे अाहेत. अारक्षणाच्या संदर्भात गैरसमज पसरवण्यात येत अाहेत, ते दूर करण्यासाठी ही बैठक घेतली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

 

गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू  :   मराठा ठोक मोर्चादरम्यान अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले हाेते. या वेळी अांदाेलकांवर दाखल केलेले किरकाेळ गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती शिष्टमंडळाला पाेलिसांनी दिली अाहे. 

 

बातम्या आणखी आहेत...