Home | Maharashtra | Mumbai | Maratha youth, do not take decision like suicide

मराठा तरुणांनाे, अात्महत्येसारखा टाेकाचा निर्णय नकाे; अाैरंगाबाद ते मुंबई पदयात्रा काढलेल्या युवकाचे अावाहन

प्रतिनिधी | Update - Sep 13, 2018, 06:34 AM IST

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी तसेच मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन

 • Maratha youth, do not take decision like suicide

  मुंबई- मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी तसेच मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन करण्यासाठी काकासाहेब पंडित मात्रे - पाटील या तरुणाने औरंगाबाद ते मुंबई अशी पदयात्रा पूर्ण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात भेट घेऊन काकासाहेब यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले. मराठा समाजाच्या सर्वच मागण्यांवर शासन सकारात्मक असून विविध निर्णयांची अंमलबजावणी होत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.


  बाळापूर (ता. औरंगाबाद) येथील काकासाहेब पंडित मात्रे – पाटील यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी तसेच मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन करण्यासाठी १ सप्टेंबरपासून औरंगाबाद येथील क्रांती चौकातून पायी प्रवास सुरू केला. बुधवारी १३ दिवसांनी ताे मुंबईत पाेहाेचला. तेथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन सादर केले.


  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काकासाहेब यांच्याशी त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर सर्वच मागण्यांवर शासन सकारात्मक आहे. अाम्ही अाजवर समाजासाठी सकारात्मक निर्णय घेतले असून त्यापैकी विविध निर्णयांची अंमलबजावणीही सुरू झाली आहे, असे त्यांनी सांगितले.


  अाज तुम्ही अात्महत्या कराल तर उद्या अारक्षण मिळाल्यास त्याचा उपयाेग काेणाला हाेणार?
  मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काकासाहेब म्हणाले, ‘मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मराठा समाजाच्या मागण्या निश्चित पूर्ण होऊ शकतील. त्यामुळे मराठा तरुणांनी नैराश्य न बाळगता वाटचाल करावी. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. यामुळे कुटुंबाचे मोठे नुकसान होते. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलाल तर जेव्हा आरक्षण लागू होईल तेव्हा त्याचा उपयोग कोणाला होणार?’ असे भावनिक उद‌्गारही त्यांनी काढले.

Trending