Home | Maharashtra | Mumbai | Marathi Actor Sharad Ponkshe writes a Facebook post against Kamal Haasan's terrorist Godse sentence

'दहशतवादाला धर्म नसतो, पण पकडलेला दहशतवादी हा मुस्लिम असतो', रंगभूमीवरील 'नथुराम गोडसे'ने केला कमल हासनचा निषेध

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 15, 2019, 03:26 PM IST

कमल हसनने गोडसेबद्दल केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे

 • Marathi Actor Sharad Ponkshe writes a Facebook post against Kamal Haasan's terrorist Godse sentence

  मुंबई- 'राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वातंत्र्यापूर्वीचा भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,' असे विधान अभिनेते आणि मक्क्ल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. अशातच आता मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनीसुद्धा कमल हासन यांचा निषेध केला आहे. शरद पोंक्षेंनी फेसबूकवरील पोस्ट मधून कमल हासन यांच्यावर जबरी टिका केली आहे.


  काय म्हणाले शरद पोंक्षें-
  "दहशतवादाला धर्म नसतो". अगदीच मान्य. पण पकडलेला दहशतवादी हा मुस्लिम असतो हे जगातल वास्तवं. हिंदू धर्म हा मुळातच सहिष्णूवादी. ईतिहास साक्ष आहे की हिंदूनी कधीही दहशतवादी कारवाया केल्या नाहीत. आक्रमणं केली नाहीत. आम्ही प्रत्येक मुसलमानाकडे दहशतवादी म्हणून बघतच नाही. म्हणूनच जगात मुसलमान सर्वात सुरक्षित व सुखी कूठे रहात असतील, तर ते हिन्दूस्थानात आणि हे कित्येक मुसलमानांच मत आहे. पण तरीही एक अभिनेता केवळ राजकीय स्वार्थासाठी हिंदू दहशतवादी असा ऊल्लेख करतोय तेही जाहिरपणे. आणि आपण ते खपवून घेतो. हाच हिंदूंचा सहिष्णूपणा."

  "आता नथूराम गोडसे ह्याने गांधीचा खून केला. ह्यावर चूक बरोबर लाखो मत मांडली गेली, चर्चा झाल्या. पण म्हणून सरसकट हिंदूनाच दहशतवादी ठरवलं जातय. हे वक्तव्य करणाऱ्या कमल हसनचा मी तीव्र विरोध निषेध करतो. आपल्याला पटल तर तूम्ही ही करा. हा कोणा पक्षाचा अपमान नाही. हा बहुसंख्य हिंदूंचा अपमान आहे. तथाकथित पुरोगामींनीही निषेध करायला हरकत नाही.
  धन्यवाद- शरद पोंक्षे.." अशी फेसबूक पोस्ट त्यांनी केली आहे.

  दुसरीकडे भाजपच्या अनेक नेत्यांनी कमल हासनवर टीका केली आहे. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. त्यामुळे हासन यांचे विधान विशिष्ट धर्माला लक्ष्य करणारे आहे. त्यामुळे त्याचा निषेधच करायला हवा, असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Trending