शट डाऊन / मराठीतील या प्रसिद्ध अभिनेत्यावर आली स्वतःचा हॉटेल व्यवसाय बंद करण्याची वेळ

शशांकने वैयक्तिक कारणामुळे हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Oct 11,2019 05:33:47 PM IST

बॉलिवूड डेस्कः मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्द अभिनेता शशांक केतकरच्या एका इन्स्टाग्राम पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून शशांकने त्याचे हॉटेल बंद करणार असल्याची माहिती दिली आहे. साडे तीन वर्षांपूर्वी पुण्यात आईच्या गावात या नावाने शशांकने स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरु केला होता. त्याच्या हॉटेलला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. पण आता वैयक्तिक कारणामुळे हॉटेल बंद करत असल्याची माहिती शशांकने दिली आहे.


शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, शाळा-कॉलेजमध्ये असताना एक स्वप्न पाहिलं होतं की, आपलं स्वतःचं हॉटेल असलं पाहिले आणि ते स्वप्न पूर्ण ही झालं! पुण्यात 'आईच्या गावात' या नावाने हॉटेल सुरुही केलं आणि गेली साडे तीन वर्ष आई बाबा, दीक्षा, प्रियांका आणि हॉटेलचा सगळा स्टाफ यांच्या सपोर्टने ते उत्तम चालूही ठेवलं. पण काही वैयक्तिक कारणांमुळे आता आम्हाला हा व्यवसाय बंद करावा लागतोय. आत्ताच्या जागेवर संपूर्ण सेटपसहित जर कोणाला हॉटेल चालवायचे असल्यास मला संपर्क साधावा किंवा हॉटेलचे सामान विकत घ्यायचे असल्यासही मला संपर्क साधावा.


12 ऑक्टोबर 2016 रोजी अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या हस्ते शशांकच्या हॉटेलचे उदघाटन झाले होते. शशांकने त्याच्या हॉटेलचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

शशांकच्या वर्कफ्रंटविषयी सांगयेच झाल्यास सध्या तो छोट्या पडद्यावर 'सुखांच्या सरीने हे मन बावरे' या मालिकेत झळकतोय. शिवाय रंगभूमीवरही तो अॅक्टिव आहे. 'कुसुम मनोहर लेले' हे त्याचे नाटक सध्या सुरु आहे.

X