आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी कलाकारांनी एकाचवेळी ट्विट केले #पुन्हानिवडणूक, भाजपाला सपोर्ट करत असल्याचा कलाकारांवर आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्रातात सत्ता स्थापनेचा पेच सुटत नाहीये. यातच राजकारणी अनेक डावपेच करत आहेत. निवडणुकीनंतर अद्याप एकही पक्ष सत्ता स्थापन करू शकलेला नाही. एकीकडे राष्ट्रपती राजवट लागू झालेली असताना एकतरी पक्ष सत्ता स्थापन करू शकेल की नाही, याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे राजकारणाच्या बाबतीत एखादी छोटीशी गोष्ट घडल्यास सर्वांचे लक्ष वेधले जाते. अशात मराठी कलाकारांचे हे नवीन हॅशटॅग चर्चेचा विषय बनले आहे.

आज सकाळी 10.30 ते 11 वाजेच्या सुमारास काही प्रसिद्ध मराठी कलाकारांनी #पुन्हानिवडणूक असा हॅशटॅग चालवायला सुरुवात केली. अनेकांनी याचे वेगवेगळे अर्थ काढले. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा भाजपचाच कट असल्याचा आरोप केला. सचिन सावंत यांनी ट्विट करत या कलाकारांवर सडकून टीका केली. सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी यांच्यासह अनेक कलाकारांनी हे हॅशटॅग वापरले. त्यामुळे युजर्सही त्यांच्यावर खूप नाराज झाले आहेत. मात्र यानंतर माहिती मिळाली की, हे हॅशटॅग एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वापरले जात आहे. समीर विध्वंस यांचा आगामी चित्रपट 'धुरळा' याच्या प्रमोशनसाठी हे हॅशटॅग वापरले जात असल्याचे चित्रपटाशी निगडित एका सदस्याने सांगितले.  आता या हॅशटॅगचा नेमका अर्थ काय लावायचा हे मात्र येणार काळच सांगेल. 

बातम्या आणखी आहेत...