आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी अभिनेत्री दीपाली सय्यदचा मेटेंच्या 'शिवसंग्राम'मध्ये प्रवेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप युतीसोबतच लढवणार असल्याची घोषणा 'शिवसंग्राम'चे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी मंगळवारी पुण्यात केली. शिवसंग्रामप्रणीत भारतीय संग्राम परिषदेच्या मेळाव्यात ते बोलत होते. अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद यांनी या वेळी पक्षात प्रवेश केला. 


मेटे म्हणाले,की प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत गोरगरीब जनतेला अनेक गोष्टींपासून वंचित ठेवले. परंतु आता शिवसंग्राम पक्षाच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक परिवर्तनाची लाट निर्माण करायची आहे. सामाजिक, राजकीय जीवनात वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही सौदेगिरी केली नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसंग्राम पक्ष सर्व ताकदीने उतरणार आहे. आज आपले दोन आमदार आहेत. आगामी निवडणुकीत ही संख्या ५ ते १० पर्यंत जाण्याचा निर्धार केला पाहिजे. 'काही वर्षांपूर्वी राजकारणात येण्याचा विचारदेखील नव्हता. परंतु २०१४ मध्ये पहिली निवडणूक लढवली. शिवसंग्रामचे व्यसनमुक्ती, स्त्री भ्रूणहत्या आदी काम पाहून या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला,' असे दीपाली भोसले-सय्यद म्हणाल्या. 

बातम्या आणखी आहेत...