आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GOOD NEWS : क्रांती रेडकर झाली आई, घरी झाले दोन चिमुकल्या परींचे आगमन, दीड वर्षांपूर्वी गाजावाजा न करता थाटले होते लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रीने म्हणजे क्रांती रेडकर ही आई झाली असून तिने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. 3 डिसेंबर रोजी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात क्रांतीने जुळ्या मुलींना जन्म दिल्याचे वृत्त आहे. याचवर्षी ऑक्टोबर महिन्यात क्रांतीने तिचा डोहाळे जेवणातील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करुन गोड बातमी असल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले होते. 

 

दीड वर्षांपूर्वी थाटले होते गुपचुप लग्न... 
क्रांती रेडकर हिच्या पतीचे नाव समीर वानखेडे असून ते पोलीस अधिकारी आहेत. 29 मार्च 2017 रोजी क्रांती आणि समीर यांचे लग्न झाले होते. विशेष म्हणजे क्रांतीने लग्नाविषयी गुप्तता बाळगली होती.या लग्नसोहळ्याला क्रांतीच्या जवळच्या मैत्रिणी आणि नातेवाईक उपस्थित होते. क्रांतीने सोशल मीडियावर आपल्या नावासमोर दोन आडनावं लावल्यानंतर तिच्या लग्नाविषयी चाहत्यांना समजले होते. 


या लग्नाबद्दल क्रांतीने सांगितले होते, “माझे पती हे देश सेवेत असल्याने त्यांच्यासाठी त्यांची ओळख उघड करणे अवघड आहे आणि त्यामुळेच आम्ही दोघांनी अगदी साधेपणाने लग्न केले. मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगणारी व्यक्ती आहे. त्यामुळे माझ्यातील वेडेपणा आयुष्यभर राहू देणारा नवरा मला मिळाला पाहिजे असे माझ्या मैत्रिणींना नेहमीच वाटायचे आणि तो तसाच आहे’.

 

बातम्या आणखी आहेत...