Home | Bollywood | Marathi Cinekatta | Marathi Actress Mrunal Dusanis Comeback New Serial He Man Baware

मृणाल दुसानिसच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, 'हे मन बावरे'मधून करतेय TV वर कमबॅक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 12, 2018, 03:57 PM IST

कलर्स मराठीवरीलच 'हे मन बावरे' या मालिकेतून मृणाल दुसानिस पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  • Marathi Actress Mrunal Dusanis Comeback New Serial He Man Baware

    कलर्स मराठीवरील 'अस्सं सासर सुरेख बाई' या मालिकेतील जुई म्हणून मृणाल दुसानिसला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मृणालचा गोड चेहरा, हास्य आणि अभिनय यामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली. आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज आहे. कलर्स मराठीवरीलच “हे मन बावरे” या मालिकेतून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

    “हे मन बावरे” मालिका 9 ऑक्टोबरपासून कलर्स मराठीवर सुरु होत आहे. मालिकेमध्ये बिग बॉस मराठीमधील शर्मिष्ठा राउत देखील असणार आहे. शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे. या दोघांना पहिल्यांदाच एकत्र काम करताना बघणे प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे. मालिकेची कथा काय असेल ? मालिकेमध्ये अजून कुठले कलाकार असतील ? हे सगळे गुलदस्त्यातच आहे.

Trending