आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day : ही आहे मराठी इंडस्ट्रीतील Bold अॅक्ट्रेस, बघा नेहा पेंडसेच्या दिलखेचक अदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखल्या जाणा-या नेहा पेंडसेचा आज वाढदिवस असून तिने वयाची 34 वर्षे पूर्ण केली आहेत. 29 नोव्हेंबर 1984 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. अलीकडच्या काळात नेहा बिग बॉसच्या 12 व्या पर्वात सहभागी झाल्याने चर्चेत आली होती. पण बिग बॉसच्या घरात ती लांबचा पल्ला गाठू शकली नाही आणि कमी मत मिळाल्याने तिला घरातून बेघर व्हावे लागले. यापूर्वी नेहा तिच्या पोल डान्समुळे चर्चेत आली होती. नेहाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोल डान्सची प्रॅक्टिस करतानाचे बरेच व्हिडिओ तिने शेअर केले होते. सोशल मीडियावर नेहा अॅक्टिव असते. स्वतःविषयीचे अपडेट्स आणि फोटोज नेहा नित्यनेमाने सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने शेअर केलेल्या या फोटोवर सर्वांच्याच नजरा खिळल्या असतात. 


नेहाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाहुयात, नेहाच्या दिलखेचक अदा... 

बातम्या आणखी आहेत...