आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या कारणाने पहिल्या बॉयफ्रेंडने सोडली नेहाची साथ, आता बिझनेसमनला करतेय डेट, वाचा नेहाविषयी A to Z

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कुठेही मागे राहू इच्छित नाही. येथील अनेक अभिनेत्री आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. सई ताम्हणकर, श्रुती मराठे, राधिका आपटे, मानसी नाईक या अभिनेत्रींसोबतच आणखी एक मराठमोळे नाव आहे, ज्याची मराठीतच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही चर्चा होते. ते नाव म्हणजे नेहा पेंडसे. नेहा मराठी, हिंदीतीलच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेला चेहरा आहे. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या नेहाचा आज वाढदिवस असून तिने वयाची 35 वर्षे पूर्ण केली आहेत. 29 नोव्हेंबर 1984 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला.  नेहाने आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही तिने मुख्य भूमिकाही केली आहे. पण, नेहाला या प्रवासात काही अडथळ्यांनाही सामोरं जावं लागलं. नेहाला चित्रपटसृष्टीत काम करताना, अनेक जणांकडून कास्टींग काऊचची ऑफर आली होती. स्वतः नेहाने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.

 • काय म्हणाली होती नेहा...

नेहा म्हणाली होती, ''माझ्या कुटुंबातील कुणीही चित्रपटसृष्टीशी संबंधित नाहीये. त्यामुळे ज्यावेळी मी या फिल्डमध्ये काम करण्याचं ठरवलं त्यावेळी अनेकांनी टीका केली. कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. दाक्षिणात्य आणि हिंदीमध्ये काम शोधताना मला सतत कास्टींग काऊचसाठी विचारण्यात आले आहे. मी नेहमीच या गोष्टीला विरोध करुन पुढे गेले आहे.  या गोष्टीसाठी ज्यांनी होकार दिला त्या अभिनेत्री आज शिखरावर पोहचल्या आहेत. ज्या मुलींनी हे केलेय त्या चुकीच्या आणि ज्यांनी हे केले नाही त्या बरोबर असे माझे अजिबात म्हणणे नाही. या फील्डमध्ये तुमचा गॉड फादर असणे गरजेचे आहे. पण, याचा अर्थ असा नाही की, तुमची कास्टींग काऊचपासून सुटका होईल. गॉड फादर असल्यास तुम्हाला योग्य वाट सापडते आणि काम शोधण्यासही सोयीस्कर पडतं, हाच याचा फायदा आहे.''  

 • वजन कमी करण्यासाठी नेहाला मिळाला होता अल्टिमेटम....

छोट्या पडद्यावरील गाजलेल्या 'मे आय कम इन मॅडम' या मालिकेत नेहाने ग्लॅमरस तरुणीची भूमिका वठवली होती. ग्लॅमरस भूमिका असल्याने नेहाला स्लिम दिसणे गरजेचे असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे होते. तीन महिन्यांत नेहाचे सात किलो वजन वाढले होते. त्यामुळे भूमिकेच्या मागणीसाठी निर्मात्यांनी नेहाला लवकरात लवकर वजन कमी करण्याची ताकीद दिली होती. वजन कमी न केल्यास तिच्याऐवजी दुस-या अभिनेत्रीची वर्णी मालिकेत लागणार असल्याची चर्चासुद्धा झाली होती. आता ही मालिका ऑफएअर झाली आहे. 

 • का झपाट्याने वाढले होते नेहाचे वजन...

नेहाने एका मुलाखतीत तिचे वजन झपाट्याने का वाढले याचे कारण सांगितले होते. बॉयफ्रेंडने ब्रेकअप केल्यानंतर नेहा मानसिक तणावात गेली होती. याविषयी ती काही दिवसांपूर्वी मुलाखतीत म्हणाली होती, "मी माझे वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. पण काही केल्या माझे वजन कमी होत नाहीये. मी डाएटदेखील केला. पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आता नुकत्याच मी काही वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत. त्यात माझ्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मनावरील ताणामुळे असे घडते असे मला सांगण्यात आले. कॅमेऱ्यावर तर माझे वाढलेले वजन लगेचच दिसून येत आहे आणि त्यातही मे आय कम इन मॅडम या मालिकेत मी एक मॉडर्न मुलगी दाखवली असल्याने मला पाश्चिमात्य कपडे घालावे लागतात. या कपड्यांमध्ये तर माझे वाढलेले वजन पटकन दिसून येत आहे. माझ्या अनेक चाहत्यांनी मला या गोष्टीविषयी सांगितले आहे. पण आता काहीही करून वजन कमी करायचे असे मी ठरवले आहे. आणि त्यासाठी मी आता ध्यानधारणा करायला सुरुवात केली आहे. कारण तुमच्या मानसिक आरोग्यकडेदेखील तुम्ही लक्ष देणे गरजेचे आहे. पण त्यातूनही वजन कमी करायला किती अवधी लागणार हे मला माहीत नाही."

 • बॉयफ्रेंडने ब्रेकअप केल्यानंतर मानसिक तणावात होती नेहा...

नेहाने तिचे ब्रेकअप झाल्याचे मान्य करत सांगितले होते, "मी मानसिक तणावातून जात असल्याने माझ्या आरोग्यावर त्याचा परिणाम झाला आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी माझे माझ्या प्रियकरासोबत ब्रेकअप झाले. आमच्या दोघांमधील नाते खूप छान होते. तो एनआरआय असल्याने मी अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णयदेखील घेतला होता. पण अखेरच्या क्षणी त्याने माघार घेतली."

 • नेहाच्या बॉयफ्रेंडने का घेतली अखेरच्या क्षणाला माघार...

नेहाने तिच्या ब्रेकअपचे कारण सांगितले होते, ती म्हणाली होती, "मी अभिनेत्री असल्याने मी नेहमीच माझ्या करियरला प्राधान्य देणार आणि त्यामुळे मी एक चांगली गृहिणी होऊ शकणार नाही असे त्याचे मत होते. आता त्याचे लग्नदेखील झाले आहे. मी या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी गेली दीड वर्ष स्वतःला कामात झोकून दिले होते. पण याचाच माझ्या तब्येतीवर परिणाम झाला. कोणत्याही व्यक्तिसाठी बदलायचे नाही असे मी ठरवले असून मला भविष्यात लग्न करायचे आहे. पण माझ्या पतीने मला समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे." 

 • आता व्यावसायिकाला करतेय डेट...

ब्रेकअपनंतर आता नेहाला पुन्हा एकदा प्रेम गवसले आहे. शार्दुल सिंग बयास या व्यावसायिकाला नेहा डेट करतेय. स्वतः नेहाने ही कबुली दिली आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केल्यानंतर साखरपुड्याच्या चर्चांमुळे अभिनेत्री नेहा पेंडसे चर्चेत आली होती.  मात्र तिने साखरपुड्याच्या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं होतं. शार्दूल व्यावसायिक असून त्याला काही राजकीय पार्श्वभूमी असल्याचंही कळतंय. नेहाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शार्दूलसोबतचे काही फोटो पाहायला मिळतात.

❤️

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

 • बालकलाकार म्हणून केली होती नेहाने करिअरची सुरुवात...

'दाग-द फायर' या हिंदी सिनेमात बाल कलाकार म्हणून भूमिका केली होती. याशिवाय अशोक समेळ लिखीत आणि दिग्दर्शित 'परपुरुष' या नाटकाद्वारे तिने मराठी रंगभूमीवरही पदार्पण केले आहे. दुसरी गोष्ट, प्रेमासाठी कमिंग सून, शर्यत, बाळकडू, नटसम्राट हे अलीकडच्या काळात रिलीज झालेले तिचे मराठी सिनेमे आहेत.

 • वयाच्या 10 व्या वर्षी मिळाली होती पहिली सॅलरी

- नेहाने सांगितले, की तिने बालकलाकार म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली होती.  - वयाच्या10 वर्षी पहिल्यांदा तिला पैसे मिळाले होते. 500 रुपये तिची पहिली कमाई होती, ती तिने तिच्या आईवडिलांना दिली होती.

 • अभिनय क्षेत्राची निवड केल्याने झाली होती बरीच टीका...

- नेहाच्या कुटुंबाचा सिनेसृष्टीशी काडीमात्रही संबंध नाहीये.  - त्यामुळे तिने जेव्हा या क्षेत्राची निवड केली, तेव्हा नातेवाईकांनी तिच्यावर बरीच टीका केली होती.  - याविषयी नेहा सांगते - नातेवाईकांडून मला बरेच टोमणे मिळाले होते. मात्र आज या क्षेत्रात माझे नाव झाल्यानंतर नातेवाईक म्हणतात, ‘अरे नेहा माझी कजिन आहे, नेहा माझी बहीण आहे.’

 • मीडल क्लास फॅमिलीतून आहे नेहा

- नेहा सांगते, मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे. बालपणापासूनच मी सिनेसृष्टीत सक्रीय आहे.  - 29 नोव्हेंबर 1984 रोजी मुंबईत नेहाचा जन्म झाला.  - तिचे वडील बिझनेसमन तर आई गृहिणी आहे.  - या क्षेत्रात येण्यासाठी आईने प्रोत्साहन दिल्याचे नेहा सांगते.