आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTERVIEW : ‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा, सांगतेय पर्ण पेठे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाय झेड, फास्टर फेणे, फोटोकॉपी या सिनेमामुळे पर्ण पेठे हे नाव मराठी इंडस्ट्रीत लोकप्रिय झाले आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ संपूर्ण महाराष्ट्रात 31 ऑगस्ट 2018 रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमात पर्ण पेठे ही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. गिरीश जयंत जोशी यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे आणि आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील (एस पी एंटरटेन्मेंट) आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत आहे.

 

‘ही एक सर्वसामान्य कुटुंबाची कथा असली तरी सायबर क्राईम सारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृति करण्याचे काम करेल’ असे पर्ण पेठे म्हणाली.

 

‘टेक केअर गुड नाईट’ ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. आईबाबा आणि दोन मुले असे हे एक गोड कुटुंब आहे. शाळेमध्ये काही मुले खूप हुशार असतात तर काही मुले खूप दंगेखोर असतात अशाच मुलांकडे सगळ्यांचे लक्ष असते, पण अशी काही मुले पण असतात ती खूप हुशार नसतात व ती दंगे पण करत नाहीत अशा मुलांचे ही मुलगी प्रतिनिधित्व करत असते. तिला जास्त लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही. म्हणूनच ती मोबाईल किंवा इंटरनेट यांचा आधार घेत असते. एक दिवस चॅटींग करताना अचानक काय कॉम्पलीटीसी तयार होते. मग तो प्रॉब्लेम सोडवताना कुटुंबाला काय अडचणी येतात याची ही गोष्ट आहे.   

बातम्या आणखी आहेत...