आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री प्रार्थना बेहरेचे हे फोटोशूट पाहिलंत का! दिलखेचक अंदाज बघून तुम्हीही म्हणाल वॉव  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः प्रार्थना बेहरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचे नाव आहे. चित्रपटांसोबतच प्रार्थना सोशल मीडियावरही अॅक्टिव असते. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज शेअर केले आहेत. निळा आणि पोपटी कॉम्बिनेशन असलेल्या गाऊनमध्ये प्रार्थनाचा स्टनिंग लूक बघायला मिळतोय. तिचे हे फोटो बघून तुमच्याही तोंडून वॉव हेच शब्द बाहेर पडतील.  प्रार्थनाने फोटो शेअर करुन #look4, #newphotoshoot #newlook #newme #happyme हे कॅप्शन दिले आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर भरत पवार यांनी प्रार्थनाच्या या दिलखेचक अदा आपल्या कॅमे-यात बंदिस्त केल्या आहेत. प्रार्थनाचे हे नवीन फोटोशूट नेमक्या कुठल्या प्रोजेक्टसाठी आहे, याचा उलगडा मात्र तिने केलेला नाही. यापूर्वी प्रार्थना तीन फोटोशूट केले आहेत. त्यापैकी पहिले फोटोशूट हे मॉर्डन रुपातील तर इतर दोन हे पारंपरिक पेहरावातील आहे. 

प्रार्थनाच्या या फोटोशूटला चाहत्यांसोबतच तिच्या सेलिब्रिटी मित्रांनीही पंसती दर्शवली आहे.  अभिनेता स्वप्नील जोशीने प्रार्थनाचे फोटो बघून 'स्टनिंग अॅज युझवल' अशी कमेंट केली आहे.

'जय महाराष्ट्र ढाबा भडिंडा', 'कॉफी आणि बरंच काही', 'मितवा', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी' हे मराठी आणि 'लव्ह यू मिस्टर कलाकार', 'बॉडीगार्ड' आणि 'वजह तूम हो' या हिंदी चित्रपटांमध्ये प्रार्थना झळकली आहे.

14 नोव्हेंबर 2017 रोजी दिग्दर्शक अभिषेक जावकरसोबत तिने लग्न थाटले. अभिषेक आणि प्रार्थनाचे अरेंज मॅरेज असून एका मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. अभिषेक दिग्दर्शकासोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्यूटर आहे. 'डब्बा ऐस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' या चित्रपटांची त्याने सहनिर्मिती केली आहे. सध्या प्रार्थना चित्रपटांमध्ये फारशी दिसत नाहीये, मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.