आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: मुलीचे लग्न लावून देताना आईला आले होते टेन्शन, आजही दीरांसमोर रेणुका यांना घ्यावा लागतो डोक्यावर पदर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. आपल्या मनमोहक हास्याने चाहत्यांना भूरळ घालणारी ही अभिनेत्री आज आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. 7 ऑक्टोबर 1966 रोजी महाराष्ट्रात रेणुका शहाणेचा जन्म झाला. मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये आर्ट्स या विषयात पदवी प्राप्त केलेल्या रेणुकाने 1992 मध्ये 'हाच सुनबाईचा भाऊ' या मराठी सिनेमाद्वारे आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती 1993 ते 2001 या काळात दुरदर्शनवर प्रसारित झालेल्या 'सुरभी' या कार्यक्रमाने. सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांच्या सुत्रसंचलनाने बहरलेला हा कार्यक्रम खूप यशस्वी ठरला होता. त्यानंतर 1994 मध्ये आलेल्या 'हम आपके है कौन' या सिनेमातील भूमिकेने रेणुकाच्या लोकप्रियतेत वाढ केली. या सिनेमानंतर मुलगी, बहीण, बायको, सून, वहिनी असावी तर ती अगदी रेणुकासारखीच असे प्रत्येकाला वाटू लागले.


काही सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर रेणुकाने अभिनेता आशुतोष राणा यांच्यासोबत लग्न करुन अभिनयाला काही काळासाठी रामराम ठोकला होता. ब-याच वर्षांनी रेणुका पुन्हा इंडस्ट्रीत परतली आहे. मात्र आशुतोष यांच्यासोबतचे रेणुकाचे हे दुसरे लग्न असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का?

 

पहिले लग्न ठरले होते अयशस्वी...
आशुतोष राणा यांच्याशी भेट होण्यापूर्वी रेणुका शहाणेंचे नॉन फिल्मी बॅकग्राउंड असलेल्या तरुणासोबत लग्न झाले होते. मात्र फार काळ त्यांचे नाते टिकले नाही. रेणुका यांच्या पहिल्या पतीविषयीची माहिती कुठेही उपलब्ध नाहीये. रेणुका यांचे पहिले लग्न हे लव्ह मॅरेज होते. पहिल्या अपयशी लग्नातून खूप काही शिकले असल्याचे, रेणुका यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.

 

राजेश्वरी सचदेवनी करुन दिली होती ओळख...
हंसल मेहता यांच्या एका सिनेमाच्या 'ट्रायल'वेळी आशुतोष राणा राजेश्‍वरी सचदेवसोबत आले होते. राजेश्वरी आणि रेणुका शहाणे या जुन्या मैत्रिणी आहेत. येथे ब-याच दिवसांनी राजेश्वरीशी भेट झाल्याने आशुतोष यांच्याकडे रेणुकाचे लक्षच गेले नव्हते. त्यावेळी राजेश्‍वरीनेच या दोघांची ओळख करुन दिली होती. त्यावेळी रेणुका यांनी आशुतोष यांचा 'दुश्‍मन' सिनेमा पाहिला नव्हता. त्यामुळे त्यांना ती ओळखू शकली नाही. या पहिल्या भेटीला तिने मुळीच सिरिअसली घेतले नव्हते. त्या भेटीनंतर दोघे संपर्कात नव्हते. मात्र 17 ऑक्टोबर 1998 रोजी आशुतोष यांनी रेणुकाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. त्यानंतर त्यांचे वरचेवर फोन सुरू झाले. एरवी इतरांशी फारशा गप्पा न मारणा-या रेणुकाची आशुतोष यांच्याशी वेव्ह लेंथ जुळू लागली. ओळख झाल्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजे 31 डिसेंबर 1998 रोजी या दोघांची भेट झाली.

 

आशुतोष यांना त्यांच्या गुरुजींनी सांगितले, 'हीच योग्य मुलगी'..
आशुतोष राणा यांच्या त्यांच्या गुरुंवर खूप विश्वास आहे. त्यांना ते दादाजी म्हणतात. त्यांच्या म्हणण्यावरुनच आशुतोष यांनी अभिनयात करिअरचा विचार केला. याच दादाजींनी "ही मुलगी तुला तुझ्यासाठी योग्य आहे'', असे सांगितले होते. एक दिवस आशुतोष यांनी रेणुकाला लग्नाची मागणी घातली. खूप विचार करून रेणुकाने आशुतोष यांना होकार दिला.

 

रेणुकाच्या आईला आले होते टेंशन...
आशुतोष राणा यांचे कुटुंब मध्यप्रदेशातील एका छोट्या गावातील आहे. आशुतोष यांच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतल्याने रेणुकाचे वडील आनंदी होते. मात्र तिच्या आई शांता गोखले यांना थोडे दडपण आले होते. त्याचे कारण म्हणजे दोन्ही कुटुंबातील परंपरा, रीतीरिवाज खूप वेगळे आहेत. शिवाय आशुतोष यांचे कुटुंब बारा जणांचे आहे. मात्र रेणुकाने त्यांची समजूत घातल्यानंतर त्यासुद्धा या लग्नाला तयार झाल्या. दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2001 मध्ये दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, रेणुका यांच्या खासगी आयुष्याविषयी आणखी बरंच काही...

 

बातम्या आणखी आहेत...