Home | Bollywood | Marathi Cinekatta | marathi celebrity shared there new year resolution

New Year Resolution : नवीन वर्षात एका मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार ही अभिनेत्री, हे आहेत मराठी सेलेब्सचे संकल्प

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 28, 2018, 11:57 AM IST

कुणी म्हणाले वाचन वाढवणार तर कुणी म्हणाले जिमला जाणार..

 • marathi celebrity shared there new year resolution

  एंटरटेनमेंट डेस्क : नवीन वर्षाचे स्वागत करायला आणि जुन्या वर्षाला बाय बाय करायला सगळेच उत्सुक आहेत. तसे आपले टीव्हीचे काही कलाकारही खूप उत्सुक आहेत. पाहुयात नवीन वर्षाचे त्यांचे रिझोल्युशन काय आहेत ते.

  शर्मिष्ठा राउत (सुखाच्या सरींनी हे मन बावरे) संयु


  नवीन वर्षात मी एका मुलीच्या शिक्षणाचा खर्च हाती घेणार..
  बेस्ट मॉमेंट बिग बॉस मराठीचा भाग झाले. मी एका मुलीला adopt केले होते. म्हणजेच तिच्या शिक्षणाचा खर्च हाती घेतला होता ती मुलगी आता पास आउट झाली आहे. आता या नव्या वर्षी मी अजून एका मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी हाती घेणार आहे. 2018 ची खास मॉमेंट म्हणजे कलर्स मराठी वाहिनीने मला संधी दिली, बिग बॉस मराठी या शोचा भाग होण्याची. मी गेले 11 वर्ष या कार्यक्रमाची fan आहे आणि माझं स्वप्न होतं या कार्यक्रमामध्ये जाण्याचे जे पूर्ण झाले.

 • marathi celebrity shared there new year resolution

  भाग्यश्री लिमये (घाडगे & सून) अमृता  


  डायरी लिहिणार ...
  2018 मध्ये घाडगे & सून मालिकेमुळे मी अनेक सुंदर क्षण अनुभवले. त्यामधलाच एक म्हणजे “स्वयंम” नावाच्या शाळेमध्ये आम्ही गेलो शूट केलं आणि त्या मुलांकडे नघून समजलं की, आपण किती छोट्या गोष्टी मनाला लावून घेतो. आणि या मुलांना छोट्या गोष्टीत देखील केवढा आनंद मिळतो. माझं New year resolution म्हणजे मी एखादी छान गोष्ट माझ्या आयुष्यात घडली की, मी ती एका डायरी मध्ये लिहून ठेवणार म्हणजे तो आठवण नेहमी बरोबर राहील.

 • marathi celebrity shared there new year resolution

  मृणाल दुसानिस (सुखाच्या सरींनी हे मन बावरे) अनु 


  New year resolution is to be Healthy & Fit
  भावाच्या लग्नाची तयारी, घरच्यांचे वाढदिवस, आजोबांची 70 रावी, आई बाबांची मदत. या सगळ्यात मी कधीच नसते त्यामुळे येत्या वर्षात मी माझ्या कुटुंबाला वेळ देण्याचे ठरवले आहे. सतत कामामध्ये असताना खाण्यापिण्याकडे दुलर्क्ष होते, तब्बेतीची हेळसांड होते, चिडचिड होते. माझं resolution हेच आहे की, येत्या नव्या वर्षात मी फिट रहण्याचा, शांत रहण्याचा प्रयत्न करणार आहे. 2018 मध्ये मी शिकले. खूप काम करायचे आहे. आणि नव्या वर्षात मी काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करणार आहे.

 • marathi celebrity shared there new year resolution

  शशांक केतकर (सुखाच्या सरींनी हे मन बावरे) सिद्धार्थ  


  नवीन गाडी घ्यायची आहे, मी लिहिलेला चित्रपट करायचा आहे.
  मी New year resolution कधीच करत नाही. पण मला असं वाटत ती करावीत, चांगलीच गोष्ट आहे कारण स्वप्न बघितली नाही तर प्रवास तितकासा Exciting नसतो. एका सिनेमासाठी प्रयत्न करतो आहे ज्याचा विषय मी लिहिलेला आहे. त्यामुळे 2019 मध्ये काहीतरी चांगल घडावं अशी माझी इच्छा आहे. चांगल वेगळं नाटक करण्याची इच्छा आहे, सिनेमे करत रहाण्याची इच्छा आहे. हेच माझं resolution आहे. नवीन गाडी घ्यायची आहे. 2018 मध्ये मोठी मालिका करण्याची संधी मिळाली. सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही सुंदर मालिका मिळाली आणि छोट्या पडद्याची ताकद एकदा पुन्हा कळाली. दोन सुंदर नाटकं करण्याची संधी मिळाली. लग्नाला एक वर्ष झालं. Patience is the key हे मला 2018 ने शिकवलं. प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष हे मला शिकवते.

 • marathi celebrity shared there new year resolution

  ओमप्रकाश शिंदे (लक्ष्मी सदैव मंगलम्) मल्हार 


  GYM ला जाणायचं resolution अपूर्णच !
  अनेकांसारखा मीही आजपर्यंत कधीही New year resolution पूर्ण केलेलं मला आठवत नाही. मी अनेकदा Gym जॉईन करायचं resolution केलं पण join केल्यानंतर काही दिवसातच जाण बंद होत. त्यामुळे मी नवीन वर्षी काही करायचं resolution ठरवत नाही, असंच जेव्हा मनापासून मला एखादं resolution करावं वाटतं तेव्हा मी ते करतो आणि पूर्णही करतो. असंच पूर्ण केलेलं resolution म्हणजे अभिनय क्षेत्रात येणं. 2018 मधे 'लक्ष्मी सदैव मंगलम् ' मालिकेच्या चित्रीकरणात खूप व्यस्त होतो. त्यामुळे अभिनयाचा आनंद तर घेतला पण बाकी काही करायला वेळ काढता आला नाही. आता 2019 मधे अभिनयासोबत इतर गोष्टीही वेळात वेळ काढून करणार.

 • marathi celebrity shared there new year resolution

  समृद्धी केळकर (लक्ष्मी सदैव मंगलम्) लक्ष्मी 


  New year resolution वाचन वाढवणार.. 
  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मी खूप excited आहे. माझे New year resolution Fast food जरा बंद करणार आहे. आणि पौष्टिक आहार खाण्याकडे लक्ष देणार आहे. वाचन खूप म्हत्वाचे असते. त्यामुळे नवीन वर्षी मी खूप वाचन करायचं ठरवलं आहे. 2018 हे माझ्यासाठी खूप महत्वाचे वर्ष होतं खूप चांगल्या गोष्टी या वर्षी माझ्या आयुष्यात घडल्या. 'लक्ष्मी सदैव मंगलम्' ही मालिका मिळाली. लोकांचे खूप प्रेम मिळाले.

 • marathi celebrity shared there new year resolution

  सचित पाटील (राधा प्रेम रंगी रंगली) प्रेम 

   
  नवीन वर्षात नीन चित्रपट करण्याची इच्छा आहे. एक संदेश देईन आपला देश हा आपले घरच आहे. त्यामुळे स्वच्छता ठेवा.

Trending