आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2019च्या निमित्ताने मराठी सेलिब्रिटींनी केले ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट, बघून तुम्हीही म्हणाल वॉव!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'झी टॉकीज' गेली 11 वर्षे सातत्याने 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा सोहळा आयोजित करत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात मोठा सोहळा म्हणून या कार्यक्रमाने  प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेले आहे. विजेते निवडण्यामध्ये प्रेक्षकांचाही थेट सहभाग असल्याने, हा सोहळा सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झालेला आहे. 2019 चे वर्ष सुद्धा याला अपवाद ठरलेले नाही. नव्या प्रतिभावान कलाकारांचा सहभाग असलेला हा सोहळा पाहण्याची सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे. 

वैभव तत्ववादी आणि अमेय वाघ या दोन चार्मिंग अभिनेत्यांनी केलेले खुमासदार सूत्रसंचालन ही या कार्यक्रमातील महत्त्वाची बाब असणार आहे. डान्स, कॉमेडी, म्युझिक अशा सगळ्याच गोष्टींनी पुरेपूर भरलेली, मनोरंजनाची एक धमाकेदार संध्याकाळ अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2019' हा नयनरम्य सोहळा 'झी टॉकीज'वर पाहायला मिळेल. यंदाच्या कार्यक्रमाचे निमित्त साधून कलाकारांचे एक खास फोटोशूट करण्यात आले आहे. 

झी टॉकीजच्या इंस्टाग्रामवर झकास असे, ब्लॅक अँड व्हाईट फोटोज पाहायला मिळतील. सोहळ्याची शान वाढवणारे सारे कलाकार या फोटोजमध्ये आहेत. अर्थात हे फोटो बघून संपूर्ण चाहतावर्ग खूपच खूष झालेला आहे. हे फोटोज बघून सगळ्या नेटिझन्समध्ये कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता वाढलेली आहे. या फोटोजवर भरपूर लाईक्सचा पाऊस पडतोय. कलाकारांचा हा अंदाज पाहून, त्यांचे सोहळ्यातील परफॉर्मन्सेस पाहण्यासाठी सर्वांची उत्सुकता वाढत आहे. चाहत्यांचा ओघ बघता लवकरच #FacesofMFK ट्रेंडिंगमध्ये दिसेल. तेव्हा हे अप्रतिम फोटोशूट पाहायला विसरू नका.