आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी कलाकारांकडून पूरग्रस्तांना 16 ट्रक साहित्य, दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे 10 कोटी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - काेल्हापूर, सांगली परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातून सुमारे १६  ट्रक साहित्याची जमवाजमव करून ते शुक्रवारी पूरग्रस्त भागात रवाना करण्यात आले. अभिनेता प्रवीण तरडे, मेघराज भाेसले, संताेष जुवेकर यांनी पुण्यात पत्रकारांशी बाेलताना ही माहिती दिली.  अभिनेते तरडे म्हणाले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्यामार्फत चित्रपट, नाट्य कलाकारांना मदतीचे आवाहन  करण्यात आले हाेते आणि त्याकरिता विनाेद सातव यांनी पुढाकार घेतला. अभिनेता सुबाेध भावे, रवी जाधव, रत्नाकांत जगताप, कुशल बद्रिगे, सर्इ ताम्हणकर, प्रिया बापट यांनीही याकरिता काम केले. राज्यभरातील विविध भागांतून वेगवेगळे साहित्य जमा करण्यात आले असून त्याला नागरिक आणि कलाकारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूूंच्या साडेपाच हजार किट तयार करण्यात आल्या असून पूरग्रस्त भागातील लाेकांना महिनाभर अन्नधान्य पुरेल अशी व्यवस्था त्या माध्यमातून करण्यात आली आहे. दिग्दर्शक अभिजित भाेसले यांनी शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी सुमारे दाेन ते अडीच टन प्राण्यांचे खाद्यपदार्थ गाेळा केले आहेत. चित्रपट महामंडळाचे राज्यभरात ४५ हजार, तर नाट्य महामंडळाचे २५ हजार सदस्य आहेत. अनेक शाखांच्या माध्यमातून कलाकारांनी मागील आठवडाभर काम केले. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातून पाच ट्रक, तर ठाणे व कल्याणमधून चार ट्रक सामान गाेळा करण्यात आले आहे. नवीन कपड्यांचा एक ट्रक पाठवण्यात आला आहे.  १६ ट्रकमध्ये  ब्लँकेट, सॅनिटरी नॅपकिन, तेल, स्वयंपाकाची भांडी पाठवण्यात आल्याचे चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज भाेसले यांनी सांगितले.

एक गावही उभारणार
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे १० कोटींची मदत देण्यात येणार आहे. तसेच एक गाव उभारण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे उत्सवप्रमुख नगरसेवक हेमंत रासने यांनी सांगितले. गावातील सर्व घरे, मंदिरे, शाळा आणि मशिदीदेखील ट्रस्टने दिलेल्या निधीतून आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने उभारण्यात येतील, असे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी शुक्रवारी जाहीर केले.

सारस्वत बँकेतर्फे १ काेटी
राज्यातील पुरग्रस्तांसाठी सारस्वत बँकेतर्फे  एक कोटी रुपयाचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आला. 

शरद पवारांचे पूरग्रस्तांसाेबत झेंडावंदन, रक्षाबंधन
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पूरग्रस्त काेल्हापूरचा दाैरा करून तेथील नुकसानीची माहिती घेतली. या पूरग्रस्तांसाेबतच त्यांनी झेंडावंदन केले.  मुस्लिम बोर्डिंग, नेहरू हायस्कूल येथे आश्रयास असलेल्या पूरग्रस्तांची त्यांनी भेट घेतली. काही महिलांनी त्यांना राख्याही बांधल्या.

बातम्या आणखी आहेत...