आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फत्तेशिकस्तची कोट्यवधीची उड्डाणे, रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांत केली एवढी कमाई  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शत्रूच्या छातीत धडकी भरविणाऱ्या मराठ्यांचा गौरवशाली इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने जगभर पोहचला. चाणाक्ष युद्धनीती अन् रणनीती हीच खरी महाराजांची ओळख. गनिमी कावा हे युद्धतंत्र शिवाजी महाराजांनी जगाला दिले. आणीबाणीच्या प्रसंगात ते योग्य ती कल्पकता वापरीत आणि शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थानांना हाणून पाडत. शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहीतील सर्जिकल स्ट्राइकच. याच सर्जिकल स्ट्राइकचा थरार 15 नोव्हेंबर रोजी मोठ्या पडद्यावर झळकलेल्या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून पहायला मिळतोय.   प्रेक्षकांना हा चित्रपट भावला असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कोट्यवधीची उड्डाणे घेताना दिसतोय. रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने तब्बल साडे तीन कोटींचा गल्ला जमवला आहे. 

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी, नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना यांसोबतच हिंदीतला प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी यांसारख्या मातब्बर कलाकारांनी ‘फत्तेशिकस्त’मध्ये भूमिका साकारल्या आहेत. अजय-अनिरुद्ध आरेकर या चित्रपटाचे निर्माते आहे. कार्यकारी निर्माते उत्कर्ष जाधव आहेत.