सिंगापूर / सिंगापूर दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'माई घाट.... ' या मराठी चित्रपटाला मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार  

हा चित्रपट एका आईच्या लढ्याभोवती फिरतो

Sep 20,2019 04:54:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : नुकताच 'माई घाट : गुन्हे क्र. 103/2005' या मराठी चित्रपटाला सिंगापूर दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी केले आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट एका आईच्या लढ्याभोवती फिरतो. जिच्या मुलाला खोट्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली जाते आणि त्याला मरेपर्यंत त्रास दिला जातो. अनंत नारायण महादेवन यांनी चित्रपटाबद्दल सांगितले की, हा चित्रपट शेवटी एक महत्वाची नैतिक कोंडी निर्माण करतो. ते पुढे म्हणाले, “सर्व काही गमावल्यानंतर खरोखरच एखादा न्याय मिळवू शकतो का ? ज्याने मला सोडले त्यांचा मी आभारी आहे, कारण त्यांनी मला शिकवले मी ते एकटेच करू शकतो,”

X