आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाली कुलकर्णीच्या 'विक्की वेलिंगकर'चा टीझर आला.. मुखवट्यामागे कोण हा प्रश्न अनुत्तरीत!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेल्या  'विक्की वेलिंगकर' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा टीझर पाहून चित्रपटात नेमकं काय होणार याविषयीची उत्कंठा ताणली गेली आहे. हातात बंदुक घेऊन उभा असलेला मास्क मॅन आणि जीवाच्या आकांतानं पळणारी सोनाली कुलकर्णी यांना दाखवत 'विक्की वेलिंगकर' च्या टीझरची सुरुवात होते. अतिशय गूढ अशा वातावरणात लागोपाठ घडणाऱ्या घटना, मास्क मॅनचा रुद्रावतार आणि सोनाली कुलकर्णीचा घाबरलेला चेहरा यामुळे एकूणच भीतीचे वातावरण निर्माण झालेले दिसते. 

ही कथा एका तरुणीवर बेतलेली असून ही तरुणी कॉमिक पुस्तक कलाकार आहे आणि ती घड्याळे विकते. आजच्या डिजिटल अनागोंदीच्या काळात ती विक्री करीत असलेल्या वस्तूंना तसे काहीच महत्त्व नाही. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानावर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची ही कथा आहे,  असं चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ शर्मा यांनी सांगितलं.