आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपट भावनिक असतो : सुभाष घई यांनी व्यक्त केले मत; गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला सुरुवात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - माझ्या यशाचे श्रेय मराठी व महाराष्ट्राला आहे. कारण माझ्या कारकीर्दीची सुरुवात १९६३ मध्ये पुणे येथून झाली. मराठी चित्रपट हे भावनिक असतात, असे मत सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी व्यक्त केले. बाराव्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होेते. २८ ते ३० जूनदरम्यान विन्सन वर्ल्डतर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटनावेळी गाेव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, खासदार संजय राऊत, शिरीष पट्टणशेट्टी, श्याम मनेकर यांच्यासह आयोजक संजय शेट्ये, श्रीकांत शेट्ये आणि ज्ञानेश मोघे यांची उपस्थिती होती.  


या वेळी डॉ. सावंत म्हणाले, गोव्यात फिल्मसिटीच्या उभारणीसाठी सरकार निश्चितच मदत करेल. गोव्यात पर्रीकरांमुळे इफ्फीची सुरुवात झाली. हा महोत्सवही आता त्याच दर्जाचा ठरत आहे. खासदार संजय राऊत यांनी गोमंतक कलाकारांचे महाराष्ट्रावर ऋण असल्याचे सांगितले. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहात जास्तीत जास्त शो दिले जावेत, असेही ते म्हणाले. या वेळी सुभाष घई निर्मिती असलेल्या ‘विजेता’ या चित्रपटाच्या पोस्टरचे िवमोचन झाले.  या वेळी महाराष्ट्र अभिमान पुरस्कार सचिन पिळगावकर, रूबाबदार व्यक्तिमत्त्व पुरस्कार प्रसाद ओक, फिट व्यक्तिमत्त्व आणि चतुरस्त्र अभिनेत्री पुरस्कार वर्षा उसगावकर, चतुरस्त्र अभिनेता पुरस्कार भरत जाधव, फिट मॉम पुरस्कार मृणाल कुलकर्णी आणि गुरू व्यक्तिमत्त्व पुरस्कार समर नखाते यांना देण्यात आला. या वेळी मानसी नाईक, पुष्कर जोग, संस्कृती बालगुडे, आशिष पाटील, पूजा सावंत आणि शुभंकर तावडे या कलाकारांनी नृत्याचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय वाघ आणि मृण्मयी देशपांडे यांनी केले. महोत्सवाला प्रेक्षकांची चांगली गर्दी लाभली. 


आज १७ चित्रपट आणि ३ लघुपट : शनिवारी मुळशी पॅटर्न, बस्ता, मोगरा फुलला, होडी, वेडिंगचा सिनेमा, डोंबिवली रिटर्न, चुंबक, इमेगो, भोंगा, अहिल्या, आरोन, सूर सपाटा, नाळ, म्होरक्या, कागर, दिठी, पोस्टमॉर्टेम, गढूळ, पाम्पलेट हे सिनेमे दाखवले जातील.